sri lanka cricket team twitter
क्रीडा

IND vs SL,3rd T20I: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! श्रीलंकेला जिंकण्यासाठी अवघ्या १३८ धावांची गरज

IND vs SL 3rd T20I 1st Inning: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना पल्लीकेलेमध्ये सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २० षटकअखेर ९ गडी बाद १३७ धावा करता आल्या आहेत. दरम्यान श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १३८ धावा करायच्या आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघातील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. सलामीला फलंदाजीसाठी आलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या १० धावा करत माघारी परतला. तर दुसरीकडे गिलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो ३७ चेंडूत ३९ धावा करत माघारी परतला. या सामन्यातही संजू सॅमसनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या सामन्यातही तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

फिनिशरची भूमिका बजावणारा रिंकू सिंग या सामन्यात केवळ १ धाव करुन माघारी परतला. संघातील मुख्य फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादववर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. मात्र तो अवघ्या ८ धावा करत तंबूत परतला. शेवटी रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. रियान परागने १८ चेंडूत २६ धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने १८ चेंडूत २५ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ९ गडी बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT