India Vs Sri Lanka 2nd T20 : टीम इंडियात पुनरागमन करणारा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग यानं नव्या वर्षाची ज्या प्रकारे सुरुवात केली, ती बघता त्याच्याकडून कुणीही ही अपेक्षा केली नसेल. श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) दुसऱ्या टी २० सामन्यात अर्शदीपनं आपल्या पहिल्याच षटकात नो बॉलची हॅट्ट्रिक नोंदवून सर्वात खराब विक्रम आपल्या नावावर केला.
एकाच षटकात अर्शदीपने लागोपाठ तीन नो बॉल फेकले. त्याच्या खराब गोलंदाजीचा मोठा फटका टीम इंडियाला बसला.
पुण्याच्या मैदानात टीम इंडियानं प्रथम गोलंदाजी केली. कर्णधार हार्दिक पंड्यानं पहिलंच षटक टाकलं. त्यात केवळ २ धावा दिल्या. त्यानंतर त्यानं अर्शदीपच्या हाती चेंडू सोपवलं. आजारी असल्यानं तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. एका महिन्याहून अधिकच्या कालावधीनंतर तो पहिलाच सामना खेळत होता. अर्शदीपच्या या 'ब्रेक'चा नकारात्मक परिणाम दिसून आला. त्यानं पहिल्याच षटकात नो बॉल टाकून सर्वात खराब कामगिरी केली. (Indian Cricket Team)
पहिल्याच षटकाच्या पहिल्या ५ चेंडूंवर अर्शदीपने केवळ ५ धावा दिल्या होत्या. मात्र अखेरच्या चेंडूवर त्यानं वारंवार त्याच चुका केल्या आणि चित्रच पालटले. अर्शदीपने लागोपाठ ३ नो बॉल फेकले. त्याचा फायदा कुसल मेंडिसने घेतला. त्यानंतर मेंडिसने फ्री हिटवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला.
नो बॉलचा सर्वात वाईट विक्रम
श्रीलंकेने अर्शदीपच्या या षटकात १९ धावा कुटल्या. याचाच अर्थ एकाच चेंडूवर १४ धावा मिळाल्या. अर्शदीपनं अशा प्रकारे नो बॉल फेकण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत अर्शदीपने याबाबतीत सर्वात खराब कामगिरी केली आहे. आशिया कपमध्ये हॉंगकॉंगविरुद्ध अर्शदीपने एकाच षटकात दोन नो बॉल फेकले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.