India vs Sri Lanka 1st T20I  Google
क्रीडा

IND vs SL 1st T20: श्रीलंकेत सूर्यकुमारचा तुफानी खेळ; लंकेसमोर २१४ धावांचे आव्हान

Bharat Jadhav

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना आज होतोय. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळत आहे. पल्लेकेले या स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी धावांचा वर्षाव केला. सूर्यकुमार यादवने तुफानी अर्धशतक केल. सूर्यकुमारने अवघ्या २६ चेंडूत ५६ धावा ठोकल्या. सूर्यकुमारसह यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत यांनीही धमाकेदार फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला.

श्रीलंका संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या आमंत्रणाचा फायदा घेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांची धुलाई. मात्र भारतीय संघाच्या ७ विकेट घेण्यात लंकेचे गोलंदाजही यशस्वी ठरलेत. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने फटकेबाजी करत २१ चेंडूत ४० धावा केल्या. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

त्याच्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफान खेळी करत २२३ च्या स्ट्राइक रेटने ५८ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २६ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या, यात ८ चौकार आणि २ षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर ऋषभ पंतने आपला दमदार खेळ दाखवत ३३ चेंडूत ४९ धावा केल्या. यात ६ चौकार १ षटकाराचा समावेश आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका खेळत आहे. संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचाही हा पहिला सामना आहे. तर दुसरीकडे चरित असलंका श्रीलंकेची कमान सांभाळत आहे.

भारत : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रायन पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तेक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT