Dunith Wellalage twitter
क्रीडा

IND vs SL, 1st ODI: हत्ती गेला पण शेपटानं घाम फोडला! वेलालागे पुन्हा एकदा टीम इंडियाला नडला

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. टी -२० मालिकेत श्रीलंकेला ३-० ने लोळवल्यानंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठीची तयारी सुरु केली. दरम्यान पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघासमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

हत्ती गेला पण शेपूट राहिलं

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज पथुम निसंकाने ७५ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. त्याला अविष्का फर्नांडोची साथ मिळाली नाही. फर्नांडो १ धाव करत माघारी परतला . त्यानंतर कुसल मेंडीस १४ धावा करत माघारी परतला. कर्णधार चरीथ असलंकाने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीप यादवने त्याला १४ धावांवर माघारी धाडलं.

भारतीय संघाने लवकर लवकर श्रीलंकेचा डाव गुंढाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वेलालागे पुन्हा एकदा भारतीय संघाला नडला. त्याने श्रीलंकेला अडचणीतून बाहेर काढत नाबाद ६७ धावांची खेळी केली. त्याला शेवटी वनिंदू हसरंगा आणि अकिला धनंजयाने चांगली साथ दिली. या खेळीच्या बळावर श्रीलंकेने ५० षटकअखेर २३० धावांपर्यंत मजल मारली.

भारत श्रीलंका पहिल्या वनडेसाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल,मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग,

श्रीलंका: चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, अकिला धनंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT