gautam gambhir twitter
Sports

Team India Head Coach: भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाचा हेड कोच बदलला; हा दिग्गज घेणार गंभीरची जागा

Team India Head Coach For India vs South Africa T20I Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी भारतीय संघाचा हेड कोच बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Ankush Dhavre

Team India Head Coach: न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौरावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये न्युझीलंडने बाजी मारत मालिका २-० ने खिशात घातली आहे. मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील मुंबईतील वानखेडे स्टेडियम रंगणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी गौतम गंभीर हेड कोच म्हणून जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावर गौतम गंभीर नव्हे तर, भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण हेड कोच म्हणून जाणार आहे.

काय आहे कारण?

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा हेड कोच म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकतो. यामागचं प्रमुख कारण म्हणजे, याच कालावधीत भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं. तर भारत - दक्षिण आफ्रिका टी -२० मालिका अचानक आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेला ८ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तर दुसरीकडे भारतीय संघ ४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT