India Celebrate After Team India Win T20 World Cup Saam Tv
Sports

T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयाचा संपूर्ण देशभरात जल्लोष, क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडत पेढे वाटून साजरा केला आनंद, पाहा VIDEO

India Celebrate After Team India Win T20 World Cup: ब्रिजटाऊनमध्ये टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर देशातील प्रत्येक शहरात आणि गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Priya More

टी- २० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दारुण परभाव केला. टीम इंडियाला पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात यश मिळाले आहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रत्येक भारतीय या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. ब्रिजटाऊनमध्ये टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर देशातील प्रत्येक शहरात आणि गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या गेल्या यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला. सर्वस्तरावरून टीम इंडियातील सर्वच खेळाडूंचे कौतुक केले जात आहे. लोक मोठ्याने भारत-भारताच्या घोषणा देऊ लागले. यासोबतच महाराष्ट्रातही लोकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

भारताच्या विजयानंतर देशात दिवाळीसारखे वातावरण होते. रस्त्यावर भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी ढोल-ताशे वाजवले, तर काही ठिकाणी फटाके फोडले, काही ठिकाणी लोकांनी मिठाई वाटली. मुंबईपासून गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, तेलंगना या राज्यामध्ये नागरिकांनी टीम इंडिया जिंकल्यानंतर जबरदस्त सेलिब्रेशन केली. सगळीकडेच फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुणेकरांनी हटके स्टाइलमध्ये जल्लोष केला. बसच्या छतावर चढून तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला.

पुण्यातील खंडूजी बाबा चौकात क्रिकेट चाहत्यांनी पीएमपीएल बसच्या छतावर चढून जल्लोष केला. पुण्यातील डेक्कन, एफ सी रोड, जे एम रोडवर चाहत्यांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी भारताचा झेंडा घेऊन भारत 'माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या. पुण्यातील अनेक हॉटेलमध्ये सुद्धा जल्लोष करण्यात आला. या हॉटेलमध्ये सामना पाहता यावा यासाठी स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले होते. भारताने सामना जिंकल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. पुण्याच्या गुडलक चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

नागपूरकरांनी देखील एकच जल्लोष केला. नागपुरच्या धरमपेठ भागातील लक्ष्मी भुवन चौकात क्रिकेटप्रेमींनी जोरदार जल्लोष केला. मोठ्या संख्येने एकत्र येत क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडत आतिषबाजी केली आणि माता की जयच्या घोषणा देत जयघोष केला. अमरावतीमध्ये देखील क्रिकेटप्रेमींनी हातात तिरंगा घेत प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी इंडिया- इंडियाच्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी डान्स करत तरुणांनी कल्लोळ केल्याचे बघायला मिळाले.

टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष भंडाऱ्यामध्ये करण्यात आला. भंडाऱ्यात दिवाळी साजरी झाली. तरुणांच्या चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात अश्रू फुलले, चौकाचौकात फटाके फुटले, हातात तिरंगा घेऊन 'भारत माता की जय'च्या जयघोष देण्यात आल्या. भंडाऱ्याच्या गांधी चौक येथे मध्यरात्रीपर्यंत तरुणांनी रस्त्यावर थांबून भारताचा अवर्णनीय विजयोत्सव साजरा केला. दुसरीकडे रायगडमध्ये देखील फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष करण्यात आला. पेण आणि महाड शहरामध्ये तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला.

कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये देखील मध्यरात्री तरुणांनी टीम इंडियाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात क्रिकेट प्रेमींनी मोठ्यासंख्येने रस्त्यावर येत फटाक्यांची आतिषबाजी करत भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्यासंख्येने क्रिकेटप्रेमी एकत्र येत डान्स करत जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. डोंबिवलीमधील फडके रोडवर डोंबिवलीकर क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी करत मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवत जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं, राऊतांनी गायलं फडणवीसांचं गुणगान

Maharashtra Live News Update: दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना लागली आग, १० ते १२ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

Chhagan Bhujbal: आरक्षण जीआरमुळे भुजबळ नाराज, मंत्रिमंडळ बैठकीवरही भुजबळांचा बहिष्कार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर टिकणार का?

Husband-Wife: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

SCROLL FOR NEXT