IND VS SA twitter
Sports

IND vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस; टीम इंडियाची बॅटिंग; पाहा दोन्ही संघांची Playing XI

India vs South Africa 2nd T20I ,Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ६१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दरम्यान मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलग दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय संघ गेल्या सामन्यातील प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार आहे. दर दक्षिण आफ्रिका संघात एक बदल करण्यात आला आहे.

कसा राहिलाय रेकॉर्ड?

हा सामना सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर ४ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान

दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन, रिझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलाने, जेराल्ड कोएटझी, केशव महाराज, नकबायोम्जी पीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT