IND vs SA 2nd T20I Weather Prediction: डरबनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ६१ धावांनी विजय मिळवला. यासह ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना जिंकून भारतीय संघ टी -२० मालिकेत २-० ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने वादळी शतकी खेळी केली. मात्र संजू सॅमसनला वगळता, कुठल्याही फलंदाजाला आपली छाप सोडता आली नव्हती. सूर्यकुमार यादवला चांगली सुरुवात मिळाली होती.
मात्र तो चांगल्या सुरुवातीचं रूपांतर मोठ्या खेळीत करू शकला नव्हता. तर दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे हे फलंदाज दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
AccuWeather ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी -२० सामन्यावेळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हा ११ टक्के इतका असणार आहे.
तर नाणेफेकीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ४९ ते ५४ टक्के इतकी असणार आहे. तर सामन्यातील दुसऱ्या डावात पाऊस पडण्याचा अंदाज ४० टक्के इतका असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता कमी आहे. पण पावसामुळे अडथळा नक्की निर्माण होऊ शकतो.
हा सामना सेंट जॉर्ज पार्कमध्ये रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मात्र सामना जसा पुढे जाईल, तशी खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करेल. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.
या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.