abhishek sharma twitter
Sports

IND vs SA: पुन्हा तीच चूक! सतत संधी मिळूनही भारताचा हा स्टार ठरतोय फ्लॉप

Abhishek Sharma,India vs South Africa 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी -२० सामन्यातही अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे.

Ankush Dhavre

IND vs SA 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी -२० सामन्याचा थरार गेकबेहराच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान या सामन्यातही अभिषेक शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.

अभिषेक शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी -२० मालिकेत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माला फलंदाजीला आला त्यावेळी तो गेराल्ड कोएत्जीच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला होता. या सामन्यात त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या होत्या.

पुन्हा तीच चूक

आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही अभिषेक शर्माने तीच चूक केली. दक्षिण आफ्रिकेकडून दुसरे षटक टाकण्यासाठी गेराल्ड कोएत्जी गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माने शॉर्ट चेंडूवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला आणि मार्को यानसेनने शानदार झेल घेतला. अभिषेक शर्माने झिझिम्बाब्वेविरुद्ध शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. गेल्या ९ सामन्यात त्याला अवघ्या १६६ धावा करता आल्या आहेत.

संजू शून्यावर बाद

या मालिकेतील गेल्या सामन्यात संजू सॅमसन शानदार शतकी खेळी केली होती. हे त्याचं टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग दुसरं शतक ठरलं होतं. त्यामुळे या सामन्यात त्याला तिसरं शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT