ind vs sa test updates X/BCCI
Sports

IND vs SA: बॉक्सिंग डे कसोटीत यजमानांचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून प्रमुख गोलंदाज बाहेर

India vs South Africa 1st Test: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 1st Test Toss Live Updates:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये सुरु आहे.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमानांच्या दिशेने लागला आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल केला आहे. रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. तर संघातील सर्वात मोठा बदल म्हणजे रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे.

त्याच्या जागी आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. तर दुसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल ठाकुरला संघात स्थान देण्यात आलं आहे. रविंद्र जडेजा बाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण परदेशात गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. मात्र तो दुखापतीमुळे या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. (Latest sports updates)

भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल खेळताना दिसून येणार आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्द कृष्णाला संधी दिली गेली आहे. या गोलंदाजांना साथ देण्यासाठी शार्दुल ठाकुरलाही संघात स्थान दिलं गेलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर, ऐडन मार्क्रम, टोनी दे झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहम, कायल वेर्रेन्ने (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, जेराल्ड कोएत्झी, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

SCROLL FOR NEXT