suryakumar yadav twitter
Sports

IND vs SA 1st T20I: भारत- दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

India vs South Africa Weather Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 1st T20I Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागावं लागणार आहे. या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होणार आहेत. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान?जाणून घ्या.

भारतात जेव्हा टी-२० सामने होतात, तेव्हा सामने ७ किंवा ७:३० ला सुरु होतात. मात्र दक्षिण आफ्रिकेत सुरु होणारे सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होणार आहेत. तर सामन्यापूर्वी नाणेफेक ८ वाजता होईल.

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही २७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १५ सामने जिंकले आहेत. तर ११ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १० सामने खेळले आहेत.यादरम्यान ६ सामने जिंकले आहेत. तर ३ सामने गमावले आहेत. यादरम्यान १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

कसं असेल हवामान?

हा सामना स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी ५ वाजता सुरु होईल. accuweather च्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण असेल. मात्र पाऊस पडणार नाही. तर संध्याकाळी ७ वाजता पाऊस पडेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर ७ नंतर पाऊस पडण्याची शक्यता ही ४७ टक्के इतकी असणार आहे. तर पूर्ण दिवस पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्क इतकी असणार आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर सामना रद्द केला जाऊ शकतो.

या मालिकेसाठी अशी आहे, भारतीय संघाची प्लेइंग ११:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT