india vs pakistan match weather update saam tv
क्रीडा

India vs Pakistan Weather Report: भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी! सामना होणार रद्द

Ankush Dhavre

India vs Pakistan Weather Update:

भारत पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे दोन्ही संघ केवळ आशिया चषकात आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. येत्या २ सप्टेंबर रोजी हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

या सामन्यापूर्वीच दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हा सामना रद्द होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेच्या पलेकलमध्ये रंगणार आहे. या सामन्यात पाऊस अडथळा निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. वेदर डॉट कॉमच्या अहवालानूसार भारत- पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याती शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे.

तर दिवसाचे तापमान २६ डिग्रीच्या आसपास असेल.तसेच १० ते १५ किमी प्रतीतास वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Latest sports updates)

भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये आमने सामने येत नाहीत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषक स्पर्धेत एकमेंकासमोर येत असतात. त्यामुळे हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो.

मात्र यावेळी पाऊस क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरू शकतो. भारतीय संघाचा हा आशिया चषक २०२३ स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे. तर पाकिस्तान संघाने या स्पर्धेला दमदार सुरूवात केली आहे.

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळ संघावर २३८ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाकडून दोन फलंदाजांनी शतकी खेळी केली होती.

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT