rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Record: हिटमॅनचा नाद करायचा नाय! 1 रन करताच मोडला मोठा रेकॉर्ड; सचिनलाही सोडलं मागे

Rohit Sharma Record: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. यापूर्वी रोहितच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली.

Ankush Dhavre

भारताचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर रोहित शर्मा सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजीला यायचा. त्यानंतर २०१३ पासून त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी मिळाली. २०१३ पासून ते २०२५ पर्यंत रोहितने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धावांचं खातं उघडताच रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

रोहित शर्माने या सामन्यात १ धाव करताच वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ९००० धावांचा पल्ला गाठला आहे. हा कारनामा त्याने १८१ व्या डावात करुन दाखवला आहे. हा रेकॉर्ड इतक्या जलद गतीने कुठल्याही फलंदाजाला करत आलेला नाही.

यापूर्वी हा रेकॉर्ड भारताचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने सलामीवीर म्हणून ९००० धावांपर्यंतचा पोहोचण्याचा पल्ला १९७ व्या डावात गाठला होता. आता रोहितने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या दिग्गज फलंदाजांना सोडलं मागे

रोहितने या मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरसह आणखी काही दिग्गज फलंदाजांना मागे सोडलं आहे. ज्यात अॅडम गिलख्रिस्ट, सौरव गांगुली आणि सनथ जयसूर्यासारख्या फलंदाजांचा समावेश आहे. यापूर्वी हा मोठा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे होता. तर सौरव गांगुलीने हा कारनामा २३१ व्या डावात, ख्रिस गेलने २४६ व्या डावात आणि अॅडम गिलख्रिस्टने हा कारनामा २५३ व्या डावात करुन दाखवला आहे.

टीम इंडियाची दमदार सुरुवात

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २४२ धावा करायच्या होत्या. भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानचा डाव अवघ्या २४१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना, रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. या दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. रोहितने २० धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार मारले आणि १ षटकार खेचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT