ind vs pak twitter
क्रीडा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Ankush Dhavre

India vs Pakistan, T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवानंतर भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. आता भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामना भारतासाठी करो या मरो सामना असणार आहे. दरम्यान या सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी ऐतिहासिक सामना असणार आहे.

भारत - पाकिस्तान सामन्यात घडणार इतिहास

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना या स्टेडियमवरील १०० वा टी -२० सामना असणार आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर या मैदानावर आतापर्यंत पुरुषांचे ९२ तर महिलांचे ७ सामने खेळले गेले आहेत. त्यामुळे हा १०० वा सामना असणार आहे.

महिलांच्या सामन्याचा रेकॉर्ड पाहिला तर, आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४ सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवरील सर्वोच्च धावसंख्या पाहिली, तर न्यूझीलंडने भारतीय संघाविरुद्ध खेळताना १६० धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाला ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या मैदानावर मोठ्या धावांचा पाठलाग करणं जरा कठीण आहे.

भारतीय पोरी इतिहास रचणार

या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. हरमनप्रीत कौरने जर ५९ धावा केल्या तर, ती टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप ३ मध्ये प्रवेश करणार आहे. या यादीत स्मृती मंधाना अव्वल स्थानी आहे. तिने ३५०५ धावा केल्या आहेत. तर शेफाली वर्माला २००० धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या ५० धावांची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT