T20 World Cup 2026 Ind vs Pak Google
क्रीडा

T20 WC मध्ये पुन्हा रंगणार Ind vs Pak सामन्याचा थरार! ICC ची मोठी घोषणा

Bharat Jadhav

टी२० वर्ल्ड २०२४चं रणसंग्राम चालू असतानाच आयसीसीने पुढील वर्ल्ड कपची घोषणा केलीय. दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये कोणते संघ पात्र ठरले आहेत, त्या संघाच्या नावे जाहीर केली आहेत. भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामाने २०२६ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या स्पर्धा होणार आहेत. अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका हे पहिल्याच फेरीत बाहेर गेलेत. गतविजेत्या इंग्लंडने शेवटच्या क्षणाला सुपर ८ च्या फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ ही पुढील फेरी नाही तर पुढील दोन वर्षात होणाऱ्या टी २० विश्वकपात प्रवेश मिळवण्याचा मार्ग आहे. ८ संघ २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार २०२६ साली होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १२ संघ पात्र ठरले आहेत.

२०२६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंकेला मिळालंय. यजमान म्हणून हे दोन्ही संघ आधीच पात्र ठरलेत. सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, बांगलादेश, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी सुपर ८ च्या एन्ट्रीसह २०२६ च्या स्पर्धेची पात्रता निश्चित केलीय. पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवता आला नसला तरी ते दोन वर्षानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेत.

आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीमुळे पाकिस्तानसह या चारही संघांनी पुढील वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता निश्चित केलीय. न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान ७ आणि आयर्लंड ११ व्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेने यजमान म्हणून आपले स्थान पक्के केलंय.

पात्र ठरलेले संघ - भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, पाकिस्तान.

उर्वरित ८ संघ कसे पात्र ठरणार? - युरोप क्वालिफायरमधून २ संघ, ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायर व अमेरिकन्स क्वालिफायरमधून प्रत्येकी १-१ संघ आणि एशिया क्वालिफायर व आफ्रिका क्वालिफायरमधून प्रत्येकी २-२ संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT