Bhujbal On World Cup Final: तुर्तास सगळं विसरा.. वर्ल्ड कप फायनलचा आनंद लुटा, तणावाच्या पार्श्वभूमीवर छगन भूजबळ यांचं आवाहन

Bhujbal On World Cup Final: छगन भुजबळ यांनी तुर्तास सगळं विसरा आणि क्रिकेट वर्ल्ड कप फायनलचा आनंद घ्या, रोजच्या कटकटी सोडा. आमच्याही डोक्यात काही घालू नका, तुमच्याही डोक्यातून या कटकटी काढून टाका, असं आवाहन केलं आहे.
Bhujbal On World Cup Final
Bhujbal On World Cup FinalSaam Digital
Published On

Bhujbal On World Cup Final

मराठा,ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात तणावाची स्थिती आहे. तर याच मुद्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भजुबळ समोरासमोर ठाकले आहेत. त्यावर छगन भुजबळ यांनी तुर्तास सगळ विसरा आणि क्रिकेट वर्ल्ड कप फायनलचा आनंद घ्या, रोजच्या कटकटी सोडा. आमच्याही डोक्यात काही घालू नका, तुमच्याही डोक्यातून या कटकटी काढून टाका, असं आवाहन केलं आहे.

भारत जिंकेल अशी अपेक्षा करूया. भारताची टीम यावेळी अतिशय मजबूत आहे. त्याची फलंदाजी पण चांगली आहे. त्यापेक्षाही भावलेली गोष्ट म्हणजे आपली बॉलिंग अतिशय चांगली आहे. शमी, सिराज, बुमराह , कुलदीप यांनी चांगली कामगिरी केली आहे. एखाद्यावेळी बॅटिंग कमी पडली तरी बॉलर ती कमतरता भरून काढतात. आपण सलग १० सामने जिंकलो आहे. तर ऑस्ट्रेलियाने दोन सामने गमावले आहेत. निश्चितचपणे आज भारत विश्व कप जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुमचा आवडता प्लेयर कोण या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, सुनिल गावसकर यांना लहानपणापासून पाहात आलो आहे, जसू पटेल त्यांनी आठ नऊ विकेट घेतल्या होत्या. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाला हरवलं तो आनंद वेगळा होता. नंतर अनेक प्लेअर होते. सध्या विराट अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहितसारखं नेतृत्व संघाला लाभलं आहे. जास्तीत जास्त रन करून पुढील बॅट्समनचे ओझे कमी करण्याचे काम रोहित करत असल्याचं ते म्हणाले

Bhujbal On World Cup Final
Sanjay Raut News: 'पुर्वी क्रिकेट खेळ होता, आता भाजपचा इव्हेंट...' संजय राऊतांची फटकेबाजी!

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध केला आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भूजबळ यांच्यात चांगलीच जुंपली होती. रोज एकमेकांवर जहरी टीका होत होती. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती आहे. दरम्यान वर्ल्डकप फायनलच्या निमित्ताने का होईना, भुजबळ यांनी केलेल्या आवाहनामुळे किमान आजचा दिवस आरोप प्रत्यारोपांच सत्र थांबण्याची शक्यता आहे.

Bhujbal On World Cup Final
Farmers Protest: 'स्वाभिमानी'चे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, FRP चे ४००, पहिली उचल ३५०० रुपये देण्याची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com