Asia Cup 2023, India vs Pakistan Match
Asia Cup 2023, India vs Pakistan Match  SAAM TV
क्रीडा | IPL

Ind vs Pak : ठरलं तर...; टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, सामने किती आणि कधी होणार?

Nandkumar Joshi

Asia Cup 2023, India vs Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी जणू पर्वणीच. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा भिडले.

टी २० वर्ल्डकपमध्येही दोघांमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळाली. आता पुन्हा टीम इंडिया आणि पाकिस्तान आशिया चषक स्पर्धा २०२३ मध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.

आशियाई क्रिकेट कौन्सिलनं गुरुवारी आशिया चषक स्पर्धा २०२३ ची घोषणा केली. स्पर्धेचा फॉरमॅट आणि गट याबाबत माहिती दिली. जय शहा यांनी गुरुवारी ट्विट केलं आहे. आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. हे संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकाच गटात आहेत.

आशिया चषक स्पर्धा २०२३ (Asia Cup 2023) सप्टेंबरमध्ये होणार आहे. एकूण सहा संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. ही स्पर्धा यावेळी वनडे फॉरमॅटमध्ये होईल. हे सहा संघ दोन गटांत विभागले आहेत. या फॉरमॅटनुसार, भारत - पाकिस्तान यांच्यातील लढती निश्चित झाल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांना ग्रुप १ मध्ये ठेवण्यात आले आहे. याच ग्रुपमध्ये श्रीलंका देखील आहे. तर ग्रुप २ मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश संघ आहे. यात एक क्वालिफायर संघही सहभागी असेल. लीग फेरीत एकूण सहा सामने खेळवले जातील.

लीग फेरीनंतर सुपर ४ फेरी होईल. याचाच अर्थ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यापैकी एका संघाचा प्रवास गट फेरीतच संपुष्टात येईल. सुपर ४ फेरीत एकूण सहा सामने होतील. त्यानंतर अंतिम फेरीत कोणते दोन संघ पोहोचतील याचा निर्णय होईल. आशिया चषक स्पर्धेत एकूण १३ सामने होतील.

भारत - पाकिस्तानमध्ये ३ लढतींची शक्यता

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता आहे. लीग राउंडमध्ये दोघे आमनेसामने येतील. सुपर ४ फेरीतही दोन्ही संघ समोरासमोर असू शकता. तर दोन्ही संघ टॉप २ मध्ये आल्यास अंतिम सामनाही बघायला मिळू शकतो.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धा २०२३ पाकिस्तानमध्ये होणार होती. पण ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही, असे संकेत दिले गेले आहेत. आता ही स्पर्धा नेमकी कुठे भरवली जाते? हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Today's Marathi News Live: मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT