axar patel twitter
Sports

IND vs PAK: 'बापू'चा नाद करायचा नाय! अक्षरचा वाऱ्याच्या वेगानं थ्रो, पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका; VIDEO पाहिला का?

Axar Patel Throw To Dismiss Imam Ul- Haq: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने वाऱ्याच्या वेगाने थ्रो करत इमाम उल हकला बाद करत माघारी धाडलं. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Axar Patel Throw, IND vs PAK: पाकिस्तानने सुरुवातीलाच मोठी चूक केली, ती म्हणजे भारतीय संघाच्या बापूला हलक्यात घेतलं. जो गोलंदाजीत आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवतो. फलंदाजीत गोलंदाजाचांची धुलाई करण्यातही त्याला महारथ आहे.

जेव्हा तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरतो, तेव्हा तो वाऱ्याच्या वेगाने चेंडू फेकून धावबादही करण्यात तरबेज आहे. असाच काहीसा कारनामा त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात करुन दाखवला.

अक्षरचा वाऱ्याच्या वेगाने थ्रो आणि फलंदाज तंबूत

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करताना बाबर आझमने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यावेळी भारताकडून १० वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. त्यावेळी इमाम उल हक स्ट्राईकवर होता.

कुलदीपने टाकलेला चेंडू इमामने हलक्या हाताने खेळून काढला, हा चेंडू मिड ऑनच्या दिशेने वेगाने गेला. त्यावेळी मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेलने चेंडू उचलला आणि वेगाने इमाम उल हकच्या दिशेने फेकला. त्याने वेगाने थ्रो केला आणि दांड्या गुल केल्या. ज्यावेळी चेंडू यष्टीला जाऊन धडकला, त्यावेळी इमाम उल हक क्रिझपर्यंत पोहोचला नव्हता.

या शानदार थ्रो मुळे पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला. इमान २६ चेंडूंचा सामना करत १० धावांवर माघारी परतला. इमाम उल हक बाद झाला त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या ५२ धावा होती. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय बाबर आझमने सुरुवातीला सार्थ ठरवला होता. त्याने सलामीला फलंदाजी करताना, २६ चेंडूंचा सामना करुन २३ धावांची शानदार सुरुवात करुन दिली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

पाकिस्तान (Playing XI): इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहीर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरीस रौफ, अब्रार अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT