IND vs PAK: टीम इंडियाला मोठा धक्का! LIVE सामन्यात मोहम्मद शमीने सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

Mohammed Shami Left The Ground, IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शमीला लाईव्ह सामन्यात मैदान सोडावं लागलं आहे.
IND vs PAK: टीम इंडियाला मोठा धक्का! LIVE सामन्यात मोहम्मद शमीने सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
mohammed shamitwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारताने पाकिस्तानात खेळण्यासाठी नकार दिल्याने भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना देखील दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यातील सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

IND vs PAK: टीम इंडियाला मोठा धक्का! LIVE सामन्यात मोहम्मद शमीने सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
IND vs PAK Champions Trophy 2025: भारताने गमावली नाणेफेक; पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय

मोहम्मद शमीने मैदान सोडलं

हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय गोलंदाजी आक्रमणाला मोठा हादरा बसला आहे. संघातील मुख्य गोलंदाज मोहम्मद शमी ३ षटक टाकल्यानंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. ही भारतीय संघासाठी अतिशय वाईट बातमी आहे.

IND vs PAK: टीम इंडियाला मोठा धक्का! LIVE सामन्यात मोहम्मद शमीने सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
IND vs PAK Champions Trophy 2025: भारताने गमावली नाणेफेक; पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय

भारतीय संघ या स्पर्धेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीशिवाय उतरला आहे. त्यामुळे शमीवर मोठी जबाबदारी आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारताकडून शमी पहिले षटक टाकण्याासाठी गोलंदाजीला आला. या षटकात शमीने १,२ नव्हे तर ५ वाईड चेंडू टाकले.

या षटकात त्याने ६ धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटाकात त्याने ४ धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकात त्याने ३ धावा खर्च केल्या. यादरम्यान तो पूर्णपणे फिट नसल्याचं दिसून आलं. दरम्यान तिसरे षटक टाकण्यानंतर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यासाठी अशी भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शामी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com