Mohammed Shami Celebration: ते Flying Kiss सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी? शमीने सामन्यानंतर केला मोठा खुलासा

Mohammed Shami Flying Kiss Celebration: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने फ्लाइंग किस सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी होतं?
Mohammed Shami Celebration: ते Flying Kiss सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी? शमीने सामन्यानंतर केला मोठा खुलासा
mohammed shamitwitter
Published On

जेव्हा जेव्हा आयसीसीची स्पर्धा येते तेव्हा शमीच्या गोलंदाजीची धार आणखी वाढते. आयसीसीच्या स्पर्धेत विकेट्स काढून देणं हे शमीच्या उजव्या हाताचा खेळ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध झाला.

या सामन्यात शमीने बांगलादेशच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. या सामन्यात त्याने १० षटक गोलंदाजी केली आणि ५३ धावा खर्च करत ५ फलंदाजांना तंबूत पाठवलं. यासह शमीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० गडी बाद करण्याचा कारनामाही करून दाखवला.

Mohammed Shami Celebration: ते Flying Kiss सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी? शमीने सामन्यानंतर केला मोठा खुलासा
Mohammed Shami Record: मोहम्मद शमीने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

ती फ्लाइंग किस नेमकी कोणासाठी?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शमीने पंजा खोलताच आकाशाच्या दिशेने पाहिलं आणि फ्लाइंग किस सेलिब्रेशन केलं. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने ते सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी होतं याबाबत खुलासाही केला.

Mohammed Shami Celebration: ते Flying Kiss सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी? शमीने सामन्यानंतर केला मोठा खुलासा
Champions Trophy: आता तर हद्दच पार केली..पाकिस्तानात पुन्हा एकदा भारतीय झेंड्याचा अपमान; VIDEO पाहून राग अनावर होईल

सामन्यानंतर बोलताना शमी म्हणाला, ' ते फ्लाइंग किस सेलिब्रेशन वडिलांसाठी होतं. ते माझे आदर्श आहेत. मी मेहनत केलीये.. पण कृपा त्यांची आहे आणि जे काही मिळालंय ते देवाच्या कृपेने मिळालं आहे.' २०१७ मध्ये शमीच्या वडिलांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. मोहम्मद शमीने या सामन्यात गोलंदाजी करताना शानदार गोलंदाजी केली. त्याने ५ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने बांगलादेशचा डाव ४९.२ षटकात २२८ धावांवर गुंडाळला.

Mohammed Shami Celebration: ते Flying Kiss सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी? शमीने सामन्यानंतर केला मोठा खुलासा
IND vs BAN Highlights: गिलने पुन्हा जिंकलं 'दिल', बांगलादेशचा हार्टब्रेक करत टीम इंडियाची विजयी सुरुवात

मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ फायनलनंतर दुखापतग्रस्त झाला होता. या सामन्यानंतर तो १४ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेतून कमबॅक केलं. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात ५ गडी बाद करुन त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

यादरम्यान त्याने सौम्य सरकार, मेहदी हसन मिराज, जाकीर अली, तंजीम हसन आणि तस्कीन अहमदला बाद करत माघारी धाडलं. या शानदार कामगिरीच्या बळावर अफगाणिस्तानचा डाव अवघ्या २२८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना गिलने शानदार शतकी खेळी करत भारताला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com