rohit sharma and team India won toss aginst new zealand in world cup 2023 semi final twitter
क्रीडा

IND vs NZ, Semi Final 2023 Toss: टॉस जिंकला आता मॅचही जिंकणार! रोहितने सांगितलं फलंदाजी घेण्याचं कारण

Ankush Dhavre

India vs New Zealand, Semi Final 2023 Toss Update:

अखेर तो क्षण आला आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्याला प्रारंभ झाला आहे. सेमीफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. या महत्वाच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडचा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसून येणार आहे.

या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त फायदा मिळतो. त्यामुळेच रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडचा संघ गोलंदाजी करताना दिसून येणार आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने ९ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. १८ गुणांसह भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघांची प्लेइंग ११

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT