IND vs NZ 2023 Semi Final: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच मारणार बाजी! ही आहेत ४ प्रमुख कारणं

Ind vs NZ World Cup Semi Final: या सामन्यात भारताचा विजय निश्चित आहे. वाचा काय आहेत यामागची प्रमुख कारणं.
India vs New Zealand cricket team
India vs New Zealand cricket teamIndia vs New Zealand cricket players - Saam TV News
Published On

Why Team India is Strong Contender to Win Semi Final:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

हा सामना जिंकून भारतीय संघाला २०१९ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा विजय जवळजवळ निश्चित आहे. काय आहेत यामगची प्रमुख कारणं? जाणून घ्या. (India vs New Zealand record)

India vs New Zealand cricket team
IND vs NZ Semi Final 2023: वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये 'गंजते' विराट अन् रोहितची बॅट; असा राहिलाय रेकॉर्ड

पहिलं कारण..(1st reason)

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ९ सामने खेळले आहेत. हे ९ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. सलग ९ सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. हीच लय जर सेमीफायनलमध्येही कायम ठेवली, तर भारतीय संघाचा विजय निश्चित आहे.

दुसरं कारण..(2nd reason)

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) रंगणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. तसेच भारत आणि न्यूझीलंड यांचा मायदेशातील रेकॉर्ड पाहिला तर, १० पैकी ८ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. (Latest sports updates)

India vs New Zealand cricket team
IND vs NZ: डायरेक्ट हिट, रनआऊट अन् वर्ल्डकपमधून एक्झिट! पाहा १४० कोटी भारतीयांचं मन दुखावणारा तो क्षण; VIDEO

तिसरं कारण..(3rd reason)

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचं श्रेय कुठल्याही एका खेळाडूचं नाही, तर संपुर्ण संघाचं आहे. कारण रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा यांनी फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं आहे. तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत मोलाचं योगदान दिलं आहे.

चौथं कारण...(4th reason)

भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. फलंदाजीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यरने ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजीत पाचही गोलंदाजांनी १० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

India vs New Zealand cricket team
IND vs NZ Toss Prediction: टॉस ठरणार बॉस! सेमीफायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाने प्रथम काय करायला हवं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com