Rohit Sharma Saamtv
क्रीडा

Rohit Sharma: 3 वर्षांपासून एकही शतक नाही! रोहितची बॅट थंड का? स्वतःचं केला खुलासा, म्हणाला; 'मला माहित आहे...'

रोहित शर्माने गेल्या 3 वर्षांपासून वनडेमध्ये एकही शतक झळकावलेले नाही, जानेवारी 2020 मध्ये त्याने शेवटचे शतक केले होते.

Gangappa Pujari

Rohit Sharma: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली. न्यूझीलंडचे अवघ्या १०९ धावांचे लक्ष घेवून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाकडून कर्णधार रोहितने अर्धशतक करत जोरदार सुरूवात करुन दिली.

मात्र रोहितची ही खेळी लवकरच आटोपली. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहितची बॅट तळपली नाही. यावर आता स्वतः रोहितने खुलासा केला आहे. रोहित शर्माने गेल्या 3 वर्षांपासून वनडेमध्ये एकही शतक झळकावलेले नाही, जानेवारी 2020 मध्ये त्याने शेवटचे शतक केले होते. (Rohit Sharma)

काय म्हणाला रोहित..?

रोहित शर्माला शतक न मिळाल्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, "मी माझ्या खेळात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकत आहे. विरोधी संघावरही दबाव टाकणे खूप गरजेचे आहे, मला माहित आहे की मोठे स्कोअर आलेले नाहीत पण त्याबद्दल फारशी चिंता नाही."

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "मी माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे, माझा दृष्टिकोन चांगला आहे आणि मी ज्या प्रकारे कामगिरी करत आहे त्यावरून मी आनंदी आहे. मला माहित आहे की मोठी धावसंख्या अगदी जवळ आहे."

यावर्षी भारताला एकदिवसीय विश्वचषक मायदेशात खेळायचा आहे, अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतेल अशी टीम इंडियाला आशा आहे. रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटचा दिग्गज मानला जातो, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांच्या जवळपास आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजय...

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ १०८ धावांत तंबूत परतला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मायदेशात भारतीय संघाचा (Team India) हा सलग सातवा मालिका विजय ठरला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT