Rohit Sharma: रोहितचा जबरा फॅन! चालू सामन्यातचं मैदानावर धावला अन् मारली मिठी, रोहितच्या कृतीने जिंकली मने, Video Viral

रोहित शर्माला भेटण्यासाठी त्याचा एक छोटा चाहता सुरक्षा कवच तोडून मैदानात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
Rohit Sharma Fan Viral Video
Rohit Sharma Fan Viral VideoSaamtv
Published On

Ind Vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुण पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांचे जोरदार प्रदर्शन हे सामन्याच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

मात्र सामन्यादरम्यान चर्चा झाली ती रोहितच्या जबऱ्या फॅनची. कर्णधार रोहित शर्माला भेटण्यासाठी त्याचा एक छोटा चाहता सुरक्षा कवच तोडून मैदानात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Cricket News)

Rohit Sharma Fan Viral Video
Ind Vs NZ ODI Series: अभेद्य टीम इंडिया! मायदेशात भारताला हरवणे कठीण, सलग सातवा मालिका विजय

याबाबत अधिक माहिती अशी की, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. न्यूझीलंडच्या १०९ धावांचे माफक लक्ष घेवून मैदानात उतरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने जोरदार अर्धशतकी खेळी केली. रोहितची ही खेळी सुरू असतानाच त्याचा एक चाहता थेट धावत मैदानावर आला. यावेळी या चिमुकल्याने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत मैदानात धाव घेतली आणि रोहितला कडकडून मिठी मारली.

Rohit Sharma Fan Viral Video
Sanjay Raut : राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ला प्रतिसाद मिळत असल्याने PM मोदींनी...'; संजय राऊतांचा रोखठोक निशाणा

सामन्यातील १० वे षटक सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. रोहितकडे (Rohit Sharma) धावत आलेल्या या चाहत्याने त्याला कडकडून मिठी मारली. यावेळी मैदानावरील सुरक्षा रक्षकही छोट्या मुलाला पकडण्यासाठी धावत आले मात्र यावेळी रोहितने त्यांना लहान मुलगा आहे, त्याला कोणतीही शिक्षा देवू नका अशी सुचना केली. सध्या सोशल मीडियावर या चाहत्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ १०८ धावांत तंबूत परतला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मायदेशात भारतीय संघाचा हा सलग सातवा मालिका विजय ठरला. त्यामुळे भारतीय संघाला मायदेशात रोखणे आता कठीण असल्याचेच आकड्यांमधून पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com