rohit sharma twitter
Sports

IND vs NZ: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! गिल अस्वस्थ, रोहित दुखापतीमुळे होऊ शकतो बाहेर

Team India Injury: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे. भारतासह न्यूझीलंडनेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

हा सामना केवळ नंबर १ वर जाण्यासाठी खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. तो हॅम्स्ट्रींगच्या दुखण्याने त्रस्त आहे. २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात तो दुखापतीमुळे काही मिनिटं मैदानाबाहेर गेला होता. मात्र अजूनही रोहित शर्मा पूर्णपणे फिट झालेला नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा भारतीय संघाचा फलंदाजीचा सराव सुरु असताना केवळ दर्शक म्हणून बाहेर बसला होता. त्याने सरावात सहभाग घेतला नव्हता. त्याची दुखापत आणखी वाढू नये म्हणून त्याने सरावात सहभाग घेतला नव्हता. रोहितसह गिलनेही सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. माध्यमातील वृत्तानुसार, गिल देखील अस्वस्थ आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंतला ताप आला होता. मात्र आता तो पूर्णपणे ठीक झाला आहे. याच सामन्यात मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर गेला होता. मात्र आता सरावात तो पूर्ण जोशमध्ये गोलंदाजी करताना दिसून आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३ षटक गोलंदाजी केल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्याने पुन्हा मैदानात येऊन गोलंदाजी केली होती.

न्यूझीलंडविरुद्ध महत्वाची लढत

भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पराभूत केलंय. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडला पराभूत करुन भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ अव्वल स्थानी पोहचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT