PAK vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाबर- आफ्रिदीची सुट्टी? संघात स्थान मिळणंही कठीण

Pakistan Playing XI: पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. दरम्यान शेवटच्या सामन्यातून बाबर आझम बाहेर होऊ शकतो.
 PAK vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाबर- आफ्रिदीची सुट्टी? संघात स्थान मिळणंही कठीण
babar azamtwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलग २ सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर बांगलादेशने देखील सलग २ सामने गमावले आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

तर ग्रुप ए मधून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

 PAK vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाबर- आफ्रिदीची सुट्टी? संघात स्थान मिळणंही कठीण
IND vs PAK : पाकिस्तानचं डोकं फिरलंय! म्हणे भारताने जादूटोणा केलाय..११ खेळाडूंसाठी २२ मांत्रिक; चर्चेचा VIDEO व्हायरल

बाबर आझमची सुट्टी होणार?

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या सुपरफ्लॉप ठरतोय. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अवघ्या २३ धावा करता आल्या होत्या. याआधी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने स्लो खेळी केली होती. त्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याची प्लेइंग ११ मधून सुट्टी होऊ शकते. त्याच्या जागी कामरान गुलाम डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

बाबर आझम बाहेर झाल्यानंतर कामरान गुलाम आणि इमाम उल हक हे दोघेही मिळून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर सौद शकील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर चौथ्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान फलंदाजीला येऊ शकतो.

 PAK vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाबर- आफ्रिदीची सुट्टी? संघात स्थान मिळणंही कठीण
IND Vs PAK : भारताच्या विजयानंतर, IIT बाबाची फजिती; केली आणखी एक भविष्यवाणी

शाहीन आफ्रिदी होऊ शकतो बाहेर

पाकिस्तानचा संघ तसाही या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीत बदल पाहायला मिळू शकतो. शाहीन आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला संधी दिली जाऊ शकते.

अशी असू शकते पाकिस्तानची प्लेइंग ११:

मोहम्मद रिझवान ( कर्णधार), इमाम उल हक, सौद शकील, कामरान गुलाम, तय्यब ताहीर, खुशदिल शाह, सलमान अली आगा, हॅरिस रऊफ, मोहम्मद हसनैन, अबरार अहमद आणि नसीम शाह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com