India vs New Zealand  Saam TV
Sports

India vs New Zealand : तिसऱ्या टी २० सामन्याआधी न्यूझीलंडला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर

भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे.

Satish Daud

India vs New Zealand : भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन नेपियरमध्ये खेळल्या जाणार्‍या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बाहेर पडला आहे. यजमान किवी संघ मालिकेत ० - १ ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी कर्णधार केन विल्यमसन बाहेर गेल्याने न्यूझीलंडला मोठा झटका बसला आहे. (India vs New Zealand 3rd T20 Latest News)

न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. पूर्व नियोजित वैद्यकीय भेटीमुळे केन विल्यमसन नेपियर मधील तिसऱ्या सामन्यांत खेळू शकणार नाही. भारत (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी २२ नोव्हेंबर) नेपियर येथील मॅक्लीन पार्क येथे खेळवला जाईल.

या सामन्यांत केन विल्यमसनच्या जागी फलंदाज मार्क चॅपमन न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. या सामन्यात टीम साऊदी कर्णधार असेल. टी २० विश्वचषकात (T20 World Cup) मिळालेला पराभव पचवत टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या येथे टी २० सीरीज खेळत आहे.

तसं पाहता भारतीय संघाची सुरूवात या स्पर्धेत अतिशय दमदार झाली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यांत भारताने न्यूझीलंडचा दारूण पराभव केला. या विजयासह भारताने तीन टी २० सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या टी २० सामन्यांत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे आव्हान उभे केले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ केवळ १२६ धावांवरच ढेपाळला. भारताकडून सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. तर दीपक हुड्डाने भेदक मारा करत ४ बळी टिपले. न्यूझीलंडकडून कॅप्टन केन विलयम्सन एकटा लढला त्याने ५२चेंडूत ६१ धावा केल्या. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा एकही फलंदाज चमकदार खेळ दाखवू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

SCROLL FOR NEXT