
IND vs NZ Match : टीम इंडियाने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची फलंदाजींची सुरूवात खराब झाली. त्यामुळे भारताने न्यूझीलंडची विजयाकडे जाणारी वाट १२६ धावांवरच रोखली. यामुळे भारताने टी -२० मालिकेच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ६५ धावांनी पराभूत केले. यामुळे टीम इंडियाची तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या विजयामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंडमधील मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियाने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली टीम न्यूझीलंड १८.५ षटकामध्येच १२६ धावांवर गारद झाली. त्यामुळे भारतानं ६५ धावांनी सामना जिंकला.
टीम इंडियाचा ३६ धावांवर पहिला गडी बाद झाला. ऋषभ पंतच्या १३ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ईशान किशनने भारताचा डाव सावरत धावसंख्या ५० पर्यंत पोहोचवली. मात्र, ईशान देखील ३१ चेंडूमध्ये ३६ धावा केल्यानंतर बाद झाला. भारताची फलंदाजी सुरू असताना मैदानात पाऊस देखील पडला. मात्र, तरीही सामन्याचे षटक कमी करण्यात आले नाही.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने एक हाती मदार सांभाळली. मात्र, दुसरीकडे फलंदाज बाद होत राहिले. श्रेयस अय्यर देखील १३ धावा करून हिट विकेटमुळे बाद झाला. तर कर्णधार १३ चेंडूमध्ये केवळ १३ धावा केल्या. दीपक हुड्डा आणि वाशिंग्टन सुंदरने शून्य धावांवर माघारी परतले. शेवटी सूर्यकुमारने ५१ चेंडूमध्ये नाबाद १११ धावा कुटल्या.
सूर्याने त्याच्या शतकी खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार ठोकले. सूर्य कुमारच्या शतकी खेळीमुळे भारताने १९१ धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचा आव्हान दिलं. मात्र, या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली टीम न्यूझीलंड १२६ धावांवरच गारद झाली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.