IND vs NZ Head To Head Record Twitter
Sports

IND vs NZ: टीम इंडिया 20 वर्षांचा दुष्काळ संपवणार? न्यूझीलंडविरुद्ध आज इतिहास रचण्याची संधी

IND vs NZ Head To Head Record: वाचा कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

Ankush Dhavre

IND vs NZ Head To Head Record:

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामना धर्मशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत न्यूझीलंडचा संघ भारतीय संघावर भारी पडला आहे.

भारतीय संघाने २००३ वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडवर शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर २० वर्षे उलटून गेली आहेत, अजून एकदाही भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करू शकलेला नाही.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

असा राहिलाय रेकॉर्ड..

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ आतापर्यंत ९ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी ५ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तर केवळ ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.

यादरम्यान एक सामना अनिर्णीत राहिला होता. हे दोन्ही बलाढ्य संघ १९७५ मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आले होते. तर २०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेतील भारत - न्यूझीलंड यांच्यात झालेला सेमी फायनलचा सामना कुठलाही क्रिकेट फॅन विसरू शकत नाही. या सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्नं हुकलं होतं. (Latest sports updates)

तसेच दोन्ही संघांचा एकूण रेकॉर्ड पहिला तर,११६ वेळेस हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ५८ तर न्यूझीलंडने ५० सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. यादरम्यान ७ सामने अनिर्णीत तर १ सामना बरोबरीत सुटला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हे दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी ४-४ सामने खेळले आहेत. हे चारही सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. सध्या न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर भारताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT