IND vs NZ Final Saam Tv
Sports

IND vs NZ Final: टीम इंडियाची 'अग्निपरीक्षा', मॅचआधीच खेळल्या 4 'गुप्त' चाली; ट्रॉफी की पराभवांची भीती?

Sports News: टी- 20 वर्ल्ड कपची फायनल मॅच आज गुजरातमध्ये होणार आहे. फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारताला तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.

Priya More

Summary -

  • टी- 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे

  • टीम इंडियाने फायनलपूर्वी काही खास रणनीती आखल्या आहेत

  • हॉटेल बदलणे, सरावाची वेळ बदलणे आणि खेळपट्टीबाबत विशेष तयारी करण्यात आली

  • भारताला तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी

T-20 वल्ड कपच्या फायनसमध्ये टीम इंडिया दाखल झालीय. मात्र फायनलमध्ये बाजी मारण्यासाठी टीम इंडिया नेमकी काय रणनीती आखतेय. मैदानातील खेळासह कोणत्या गुप्त खेळी टीम इंडियानं खेळलेत. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

क्रिकेटच्या मैदानावर बॅट आणि बॉलची जादू आपण अनेकदा पाहिली असेल, पण जेव्हा विषय विश्वचषकाचा आणि त्यातही फायनलचा असतो, तेव्हा केवळ कौशल्य पुरेसं नसतं. तिथे गरज असते 'नशिबाची' आणि क्रिकेटप्रेमींच्या 'आशीर्वादाची'. मात्र टीम इंडियानं मॅचआधी कोणते प्लॅन आखलेत. पाहूयात.

अहमदाबादमध्ये भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये राहत होता, त्या ठिकाणी राहून भारताने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना आणि यावर्षीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सुपर-8 सामना गमावला होता. त्यामुळे बीसीसीआयने हे अशुभ हॉटेल बदलल्याची चर्चा आहे. तर उपांत्य फेरीपूर्वी मुंबईत सराव करताना चंद्रग्रहणाचे सावट होतं.. त्यामुळे या ग्रहणाचे नकारात्मक परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होऊ नये, यासाठी संघ व्यवस्थापनानं सरावाची वेळ चक्क 45 मिनिटांनी पुढे ढकलली होती. त्यात ग्रहणाची वेळ टळल्यानंतरच खेळाडू मैदानावर उतरले.

टीम इंडियामधील एका सदस्यानं संघ जिथे जिथे गेला. तिथल्या मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतलाय. दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून काळ्या मातीच्या खेळपट्टीवर भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये 'लाल मातीची' खेळपट्टी करण्याचा विचार सुरू आहे.

2007 आणि 2024 नंतर आता 2026 मध्ये तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपचे जगज्जेते होण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. गेल्या काही वर्षांत अंतिम फेरीत झालेल्या चुका टाळण्यासाठी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सध्या 'साम-दाम-दंड-भेद' या सर्वच मार्गांचा अवलंब करतोय. अशातच टीम इंडियाच्या विजयासाठी सुरु असलेल्या या बदलांना अंधश्रद्धा म्हणावं की क्रिकेटवरची श्रद्धा...मात्र टीम इंडियाचा विजय व्हावा. ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात मोठी अपडेट, SIT च्या पहिल्या अहवालात १५० शिक्षकांची नावे

Daily Wear Blouse Designs: डेली युजसाठी कोणते ब्लाऊज पॅटर्न परफेक्ट?

Elvish Yadav : "तू माझ्याशी लग्न करशील..."; एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, रोमँटिक VIDEO होतोय व्हायरल

Ulhasnagar : "तेरे को पहले ही बोला..." भररस्त्यात तरुणावर चाकूने सपासप वार, उल्हासनगरमध्ये खळबळ

Congress: काँग्रेसला मोठं खिंडार! बड्या नेत्याने सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT