kuldeep yadav twitter
Sports

IND vs NZ: कुलदीपचा नाद करायचा नाय! आधी रचिन अन् मग विलियम्सनची घेतली विकेट; पाहा VIDEO

Kuldeep Yadav, Ind vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यातही रोहितने टॉस गमावला. तर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यातही न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर रचिन रविंद्रची दांडी गुल केली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने केन विलियम्सनलाही बाद करत माघारी धाडलं.

रचिन रविंद्रची दांडी गुल

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. विल यंग १५ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रचिन रविंद्रवर जबाबदारी होती. मात्र कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर रचिन रविंद्रची दांडी गुल केली.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना ११ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर कुलदीपने रचिन रविंद्रला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. कुलदीपने टाकलेला चेंडू इतका वळला की रचिन रविंद्रला कळालाच नाही आणि त्याची दांडी गुल करुन गेला.

केन विलियम्सनलाही धाडलं माघारी रचिन रविंद्रला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात त्याने केन विलियम्सनलाही बाद केलं. कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर विलियम्सनने हलक्या हाताने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू येण्याआधीच त्याची बॅट आली आणि चेंडू बॅटला लागून कुलदीपच्या हातात गेला. कुलदीपने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला आणि विलियन्सनला ११ धावांवर बाद करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT