wankhede stadium saam tv
क्रीडा

मुंबईत 3 वर्षांनंतर रंगणार कसोटीचा थरार! IND vs NZ सामन्यासाठी तिकीट कसं बुक करायचं? तिकिटांची किंमत किती?

IND vs NZ Test Series Ticket Prize: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ वर्षांनंतर मुंबईत कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 3rd Test, Wankhede Stadium Ticket Prize: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

सामन्यातील पहिल्या दिवशी पाऊस असल्याने २ सत्रातील खेळ पावसामुळे धुतला गेला आहे. हा सामना झाल्यानंतर मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तर मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने तिकीटांची विक्री केव्हापासून होणार, याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळकरी मुलांना आणि जाईल्स आणि हॅरिस शिल्ड स्पर्धेतील उपांत्यफेरीत प्रवेश करणाऱ्यांना मोफत पास दिलेजाणार आहेत.

तिकिटांची किंमत किती?

मुंबईत ३ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट परतणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. ३ वर्षांनंतर सामना होणार असल्याने मुंबईकर हा सामना पाहण्यासाठी तुफान गर्दी करु शकतात. त्यामुळे तिकिटांची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या सामन्याचं तिकिट १५०० रुपये इतकं असणार आहे.

सुनील गावसकर स्टॅन्डचं तिकीट ३२५ रुपये, तर वरच्या सेक्शनसाठी तिकिटाची रक्कम ही ६२५ रुपये इतकी असणार आहे. या तिकीट बुकिंगला येत्या १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे तिकीट पेटीएस इन्साईडरवर बुक करता येतील

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

असे आहेत दोन्ही संघ:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

न्यूझीलंड- टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), माइकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटी सामन्यासाठी), मार्क चेपमन, डेव्हॉन कॉनवे, मेट हेनरी, डेरिल मिशेल, विल ओ'रूर्के, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र , मिशेल सँटनर, बेन सियर्स, ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टिम साउदी, केन विलियमसन, विल यंग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT