Virat Kohli celebrates his century during the 3rd ODI against New Zealand at Holkar Stadium, Indore. saam tv
Sports

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

India vs New Zealand, 3rd ODI Match : विराट कोहलीच्या शानदार शतकानंतरही इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा ४१ धावांनी पराभव झाला. या विजयासह न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे.

Bharat Jadhav

  • इंदूर वनडेत भारताचा न्यूझीलंडकडून ४१ धावांनी पराभव

  • विराट कोहलीचं शानदार शतक ठरलं व्यर्थ

  • न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवशी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया दारूण पराभव झालाय. हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झाला. या अखेरच्या सामन्यात भारताचा ४१ धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या संघाने भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ४६ षटकांत २९६ धावांवर आटोपला. या विजयासह न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे. न्युझीलंचा हा विजय भारतातील पहिलाच एकदिवसीय मालिकेतील विजय आहे. न्युझीलंडने दिलेलं आव्हान पार करताना विराट कोहलीनं धमाकेदार शतक केल. मात्र त्याचे फटकेबाजी व्यर्थ ठरली.

एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना वडोदरा येथे खेळला गेला तेथे भारतीय संघाने चार विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर किवीच्या संघाने राजकोट एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताला पराभूत करत मालिका आपल्या खिश्यात घातली.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माला झाचेरी फौल्क्सने ११ धावांवर बाद केले. तर फॉर्ममध्ये असलेला कर्णधार शुभमन गिलही अवघ्या २३ धावांवर बाद झाला. त्याला काइल जेमिसनने त्रिफळाचित केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरला ख्रिश्चन क्लार्कने फक्त ३ धावांवर बाद केलं. इतकेच नाही तर गेल्या सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल इंदूरमध्ये अपयशी ठरला. फिरकी गोलंदाज जेडेन लेनोक्सने त्याला १ धावेवर बाद केलं. राहुल बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ७१/४ होती.

चार विकेट गमावल्यानंतर, विराट कोहली आणि नितीश कुमार रेड्डी यांनी पाचव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. कोहलीने ५१ चेंडूत चार चौकार आणि एक षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान, नितीश कुमारनेही ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, पण अर्धशतक केल्यानंतर तो जास्त वेळ क्रिझवर राहू शकला नाही. त्याने ५७ चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकारांसह ५३ धावा केल्या. जडेजाकडून मोठी खेळी अपेक्षित होती, परंतु तो फक्त १२ धावा करून बाद झाला.

त्यानंतर विराट कोहली आणि हर्षित राणा यांनी सातव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान कोहलीने ९१ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार मारत आपले शतक पूर्ण केलं. हे कोहलीचे ५४ वे एकदिवसीय शतक आणि एकूण ८५ वे आंतरराष्ट्रीय शतक होते. हर्षित राणाने चार षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर भारताने मोहम्मद सिराजला बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

SCROLL FOR NEXT