sarfaraz khan kl rahul  twitter
Sports

Team India Playing XI: राहुल की सरफराज? रोहित कोणाला बसवणार? पाहा दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग ११

Team India Playing XI Prediction: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ 2nd Test, Team India Playing XI: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्यासाठी दुसरा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येतील. तर नेहमीप्रमाणे विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. रोहितसमोरील सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे, शुभमन गिल आल्यानंतर कोणाला संघाबाहेर करायचं. कारण गेल्या सामन्यात गिलच्या जागी सरफराजला संधी दिली गेली होती.

या संधीचा फायदा घेत त्याने १५० धावांची शानदार खेळी केली होती. शुभमन गिल दुसऱ्या सामन्यात फिट नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.

गिल आल्यानंतर सरफराज किंवा केएल राहुलपैकी एकाला बसावं लागेल. मात्र सहाय्यक प्रशिक्षकाने केलेल्या वक्तव्यावरुन असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, केएल राहुलला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे गेल्या सामन्यात १५० धावांची खेळी करुनही सरफराजला संधी मिळणं कठीण आहे.

४ फिरकी गोलंदाजांसह उतरणार मैदानात

पुण्याची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीसाठी पोषक आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात ४ फिरकी गोलंदाजांसह उतरु शकतो. वेगवान गोलंदाज सिराजला ब्रेक देऊन त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT