ind vs nz twitter
क्रीडा

IND vs NZ सामन्याला सुरुवात! टीम इंडियाचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय; शतक झळकावणारा फलंदाज प्लेइंग ११ मधून बाहेर

Ankush Dhavre

पहिला दिवस पावसामुळे धुतला गेल्यानंतर अखेर दुसऱ्या दिवशी भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दिवसावर पावसाचं पाणी

हा सामना १६ ऑक्टोबरला सुरु होणार होता. मात्र बंगळुरुत पावसाने थैमान घातले आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी पावसाने जरा काळ विश्रांती घेतल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

भारतीय संघात कोणाला मिळालं स्थान?

या सामन्यात भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ ३ वेगवान गोलदाजांसह मैदानात उतरला होता. मात्र यावेळी भारतीय संघाने आकास दीपला संघाबाहेर करुन कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. यासह फलंदाजीक्रमातही मोठा बदल केला आहे. शुभमन गिलचा या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या जागी सरफराज खानला संधी दिली गेली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड - डेवोन कॉनव्हे, टॉम लेथम, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टीम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ रुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक आकाऊंट हॅक

VIDEO : वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी

Railway IRCTC Share : रेल्वेची मोठी घोषणा अन् शेअरमध्ये अचानक झाली पडझड; नेमकं काय घडलं?

Bhusawal News : फुटबॉल कोचिंग करून परतताच मृत्यूने गाठले; स्विच बंद करताना विजेचा जोरदार झटका

Amravati News : रवी राणा यांना मोठा धक्का ! जितू दुधानेंनी सोडली राणांची साथ | Video

SCROLL FOR NEXT