IND vs NZ 1st T20 Updates  Saam TV
Sports

IND vs NZ 1st T20 : पृथ्वी शॉला जागा नाही, 'या' खेळाडूला सलामीला पाठवणार; हार्दिक पांड्याने स्पष्टचं सांगितलं

पहिल्या टी-20 सामन्याआधी हार्दिक पांड्याने पत्रकारपरिषद घेत टीम इंडियाच्या प्लेईंग- 11 संदर्भात माहिती दिली आहे.

Satish Daud

IND vs NZ 1st T20 Updates : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला उद्यापासून म्हणजेच २७ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानावर खेळणार जाणार आहे. टी-20 मालिकेचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्याआधी हार्दिक पांड्याने पत्रकारपरिषद घेत टीम इंडियाच्या प्लेईंग- 11 संदर्भात माहिती दिली आहे.  (India vs New Zealand 1st T20I)

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी टीम इंडियाचा (Team India) युवा सलामीवर फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो पहिल्या टी-20 सामन्यांत खेळणार नाही, असं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. लवकर ऋतुराज गायकवाड दुखापतीतून सावरेल, अशी अपेक्षा सुद्धा त्याने व्यक्त केली आहे.

पहिल्या टी-20 सामन्यांत पृथ्वी शॉला संधी नाही!

दरम्यान, ऋतुराज गायकवाड याच्या दुखापतीमुळे युवा विस्फोटक पृथ्वी शॉला खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, पृथ्वी शॉला सुद्धा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागेल, असं हार्दिक पांड्याने  (Hardik Pandya) सांगितलं आहे. टीम इंडियाकडून सलामीला शुभमन गिल आणि इशान किशन येईल, असं पांड्याने स्पष्ट केलं आहे.

भारताकडून गिल-इशान किशन सलामीला

एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ)  दमदार कामगिरी करणारा शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे उद्याचा सामना तोच खेळणार, असं हार्दिक पांड्या म्हणाला. दुसरीकडे वनडे सीरिजमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर पलटवार करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आज न्यूझीलंड संघातील बहुतांश खेळाडूंनी मैदानात चांगलाच घाम गाळला आहे. न्यूझीलंडच्या टी-20 संघाची धुरा अष्टपैलू मिचेल सँटनर याच्याकडे सोपण्यात आली आहे. सरावानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सँटनर म्हणाला, आमचा संघ उद्या सकारात्मकदृष्ट्या मैदानात उतरेल. वनडे मालिकेतील झालेल्या पराभव विसरून आम्ही उद्या चांगला खेळ करू.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-११

शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

टीम न्यूझीलंड संभाव्य प्लेईंग-११

फिन अॅलन, डेव्हॉन कॉन्वे (यष्टीरक्षक), मार्क चापमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्यूसन, जैकब डफी, हेनरी शिपले, ब्लेअर टिकनर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT