ijndia vs ireland google
क्रीडा

IND vs IRE, Pitch Report: टीम इंडियासमोर आयर्लंडचं आव्हान! खेळपट्टी कोणाला देणार साथ?

India vs Ireland, Pitch Report News In Marathi: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यादरम्यान कशी असेल खेळपट्टी?

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ८ व्या सामन्यात भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना न्यूयॉर्कच्या मैदानावर रंगणार आहे. हे मैदान टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे या मैदानावर यापूर्वी जास्त सामने खेळले गेलेले नाहीत. दरम्यान भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यान खेळपट्टी कशी असेल? जाणून घ्या.

नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात आला आहे. या खेळपट्टीसाठी अॅडिलेडच्या मातीचा वापर करण्यात आला आहे. अॅडिलेडच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना बाऊन्स मिळतो. असात काहीसा बाऊन्स या खेळपट्टीवरही पाहायला मिळाला आहे. मात्र हा बाऊन्स कधी कमी तर कधी जास्त पाहायला मिळाला आहे. त्यामुळे फलंदाज अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. यासह आऊटफिल्डही स्लो असल्याचे पाहायला मिळाले आहे.

फलंदाजांची गोची तर गोलंदाजांची चांदी

या मैदानावर भारतीय संघाचा हा दुसरा तर अधिकृतरित्या पहिलाच सामना असणार आहे. यापूर्वी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातही गोलंदाज चमकले होते. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या ७७ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डावही धोक्यात आला होता.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

या स्पर्धेसाठी असा आहे आयर्लंडचा संघ:

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्रयु बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोरकन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT