IND vs IRE 2st T20I Saam tv
क्रीडा

IND vs IRE 3rd T20I: भारताने आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकली; अंतिम सामना पावसाने धुतला

IND vs IRE 3rd T20I: पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्याने भारताने टी-२० मालिका जिंकली आहे.

Vishal Gangurde

IND vs IRE 3rd T20I :

भारत विरुद्ध आयर्लंडचा टी-२० मालिकेचा तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्याने भारताने टी-२० मालिका जिंकली आहे. सतत पाऊस पडल्याने या सामन्याचा टॉस देखील झाला नाही. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

भारत विरुद्ध आयर्लंडचा मालिकेचा तिसरा सामना आज रंगणार होता. मात्र,सतत पावसाच्या धारा कोसळू लागल्याने तिसरा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसरा सामना रद्द झाल्याने भारताने आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका खिशात टाकली आहे.

या सामन्याचा टॉस सायंकाळी सात वाजता होणार होता. मात्र, सतत पाऊस पडू लागल्याने सामन्याचा टॉसही झाला नाही. पाऊस पडू लागल्याने बीसीआयआयने सामना रात्री सवा नऊ वाजता सुरू होईल, अशी अपडेट दिली. मात्र, त्यानंतरही पाऊस थांबला नाही. रात्री सवा नऊ वाजल्यानंतरही पाऊस सुरू राहिल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

टी-२० मालिका कोणी गाजवली?

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा ठोकल्या. ऋतुराजने दोन सामन्यात ७७ धावा ठोकल्या. ऋतुराज पहिल्या सामन्यात १९ धावा करून नाबाद राहिला. तर दुसऱ्या सामन्यात ऋतुराजने अर्धशतकी खेळली.

ऋतुराजने ४३ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार लगावत ५८ धावा कुटल्या होत्या. तर या मालिकेत आयर्लंडच्या अँड्र्यू बालबर्नीने ७६ धावा कुटल्या. अँड्र्यू बालबर्नीने दुसऱ्या सामन्यात ७२ धावा कुटल्या होत्या.

या मालिकेत भारतीय गोलंदाजांचा दबदबा राहिला. जसप्रीत बुमराहने ४.८८ च्या सरासरीने ४ गडी बाद केले. त्याने दोन सामन्यात प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. बुमराहने तब्बल ११ महिन्यानंतर मैदानात कमबॅक केलं आहे. या मालिकेत कर्णधार बुमराहला 'प्लेअर ऑफ सीरीज' पुरस्कार मिळाला. तर या मालिकेत रवि बिष्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी चार-चार गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT