Asia Cup 2023: युझीला संघात स्थान न मिळाल्याने पत्नी धनश्री भडकली! स्टोरी शेअर करत सिलेक्टर्सला विचारला सवाल

Dhanashree Verma Instagram Story: युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
Yuzvendra chahal with dhanashree verma
Yuzvendra chahal with dhanashree verma saam tv
Published On

Dhanashree Verma On Asia Cup 2023 Team Selection:

पाकिस्तान आणि श्रीलंकेत आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सोमवारी या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

तर या संघात काही अशा खेळाडू होते ज्यांना संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होते. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल. मात्र जेव्हा संघाची घोषणा झाली त्यावेळी युजवेंद्र चहलचं नाव यादीत नव्हतं. हे पाहून युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने संताप व्यक्त केला आहे.

Yuzvendra chahal with dhanashree verma
Asia Cup 2023: राहुल, अय्यर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर खेळणार 'हा' फलंदाज; कर्णधार रोहितने केला मोठा खुलासा

आशिया चषकासाठी आपली निवड झालेली नाही हे कळताच युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक इमोजी शेअर केला आहे. असं म्हटलं जात आहे की, युजवेंद्र चहलने या इमोजीद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे युजवेंद्र चहलच्या ट्विटनंतर त्याची पत्नी धनश्री वर्माने देखील एक स्टोरी शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने एक स्टोरी शेअर करत निवडकर्त्यांना प्रश्न विचारला आहे. तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले की, 'आता मी गांभीर्याने हा प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली आहे. अतिविनम्र आणि इंट्रोवर्ट राहणं आपल्या यशासाठी धोकादायक आहे का? की आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक्स्ट्रोवर्ट आणि स्मार्ट बनावं लागेल?' (Latest sports updates)

या ३ फिरकी गोलंदाजांना मिळाली संधी..

अजित आगरकरांच्या अध्यक्षतेखाली आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात ३ फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आली आहे.

ज्यात रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. युजवेंद्र चहलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याला यावर्षी केवळ २ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com