INDIA VS IRELAND 1ST T20I: INDIA SUFFER HISTORIC DEFEAT, FIVE BIG REASONS BEHIND THE LOSS saam tv
Sports

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमावली टी-२० मालिका

India vs Ireland 1st T20I: आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे. आयर्लंडनं या सामन्यात १८३ धावांचे आव्हान भारताला दिलं होतं. हे आव्हान पार करताना विश्वविजेता असलेला भारतीय संघाने नांगी टाकली होती.

Bharat Jadhav

  • भारताचा आयर्लंडकडून टी-20 क्रिकेटमधील पहिलाच पराभव झाला.

  • आयर्लंडने १८३ धावांचे आव्हान देत ऐतिहासिक विजय मिळवला.

  • भारताची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि प्रमुख फलंदाज अपयशी ठरले.

एका बाजूला टी-२० विश्वविजेता भारतीय संघ होता, तर दुसऱ्या बाजूला तुलनेने कमकुवत मानला जाणारा आयर्लंडचा संघ. असं असतानाही भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलंय. बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आयर्लंडने भारताचा पराभव केला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कर्णधार लॉर्कन टकर आणि गोलंदाजांनी टीम इंडियाला १४८ धावांमध्ये गारद केलं. मॅथ्यू हॅलार्ड आणि जय मुंद्रा यांनी आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच भारतीय संघाच्या अर्ध्या फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. या पराभवामुळे दोन सामन्यांची मालिका जिंकणं भारताला शक्य नाही; जरी त्यांनी पुढचा सामना जिंकला, तरी ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटणार आहे.

भारताच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे

जगातील अव्वल क्रमांकाचा T20 संघ असलेल्या भारताचा आयर्लंडसारख्या संघाकडून कसा पराभव झाला, १८२ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ अवघ्या १४८ धावांत कसा गारद झाला हे जाणून घेऊ.

पहिलं कारण खेळपट्टी

भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे बेलफास्टची खेळपट्टी. ही खेळपट्टीत दुसऱ्या डावादरम्यान लक्षणीय बदल झाला. दुसऱ्या डावात खेळपट्टीवर चेंडूला चांगली पकड (ग्रिप) मिळू लागली. चेंडू टप्पा पडल्यावर मंदावत असल्याने तो बॅटवर व्यवस्थित येत नव्हता आणि परिणामी भारतीय फलंदाजांची धावा करताना दमछाक झाली.

भारताच्या पराभवाचे दुसरे कारण फलंदाजी

अभिषेक शर्मा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने फकटेबाजी करत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. संजू सॅमसन, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांसारखे फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. तसेच अत्यंत खराब फटका मारल्यामुळे तिलक वर्माही बाद झाला.

तिसरे कारण आयर्लंडची गोलंदाजी

आयर्लंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा अचूक अंदाज घेतला होता. पदार्पण करणारे वेगवान गोलंदाज जय मुंड्रा आणि मॅथ्यू हॅलार्ड यांनी भारतीय फलंदाजांना जेरीस आणले होते. हॅलार्ड आणि मुंड्रा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. डावखुरा फिरकी गोलंदाज हम्फरीजने ३८ धावांत तीन बळी टिपले.

चौथे कारण गोलंदाजी

पराभवाचं चौथे कारण ठरली भारताची गोलंदाजी. भारतीय खेळाडूंनी अत्यंत सुमार दर्जाची गोलंदाजी केली. आयर्लंडला मोठी धावसंख्या उभारू देण्यात प्रसिद्ध कृष्णाची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने आपल्या चार षटकांत ५७ धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात १९ धावा दिल्या

पाचवे कारण क्षेत्ररक्षण

गोलंदाजी प्रमाणे भारतीय क्रिकेटर्सनं क्षेत्ररक्षणही अत्यंत गचाळ केलं. भारतीय संघाने एकूण तीन झेल सोडले. यापैकी एक झेल अभिषेक शर्माने सोडला. जो गॅरेथ डेलानीचा होता. डेलानीला केवळ एका धावेवर असताना जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने ३२ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT