Ind Vs IRE T20: वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणात पावसाचा अडथळा; भारत-आयर्लंड पहिला टी २० सामना रद्द होणार?

India Ireland first t20 weather forecast today : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला टी २० सामना आज, शुक्रवारी बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे. पण त्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो. हा सामना पावसामुळं रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत-आयर्लंड सामना रद्द होणार?
Ind vs IRE T20saam tv
Published On

अफगाणिस्तानला लोळवल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात आज शुक्रवारपासून (२६ जून) होत आहे. पहिला सामना बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानात होत आहे. भारताचा अवघ्या १५ वर्षांचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी या सामन्याद्वारे पदार्पण करणार का, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. जर आज पदार्पण केलं तर, सचिन तेंडुलकरचा भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम वैभव मोडीत काढणार आहे. पण वैभवच्या पदार्पणात पाऊस खोडा घालू शकतो. बेलफास्टमध्ये वातावरण आलबेल नाही. भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. हा सामना पावसामुळं रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाचं संकट

भारत विरुद्ध आयर्लंड सामना भारतीय वेळेनुसार, आज संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. बेलफास्टचं हवामान त्या वेळेत खराब असणार आहे. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, दुपारी १ ते संध्याकाळी ४ या वेळेत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे. तसेच सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय येऊ शकतो.

स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. पुढील दोन तासांत वाढ होऊन ५९ आणि ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. बेलफास्टमध्ये आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास पावसाची शक्यता ५९ टक्के आहे. तर दुपारी तीन वाजता ५१ टक्के, तर ४ वाजता हवामानात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मैदान सुकण्यासाठी कमी वेळ असणार आहे. त्यामुळे पहिला टी २० सामना पावसामुळे रद्द केला जाऊ शकतो.

वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, मग कुणाची संधी हुकणार?

आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधीच्या सराव सत्रानंतर आलेल्या रिपोर्टनुसार, वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळू शकते. त्यामुळे पहिल्याच टी २० सामन्यात अभिषेक शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. डावखुरा आणि उजव्या हाताच्या फलंदाजाचे कॉम्बिनेशन ठेवण्यासाठी संजू सॅमसन वैभव सूर्यवंशीसोबत सलामीला येऊ शकतो. इशान किशन तिसऱ्या, श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात उतरेल.

भारत-आयर्लंड सामना रद्द होणार?
India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com