Maharashtra News Live Update: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रात्री 10 वाजेनंतर भूकंपाचे धक्के

Marathi Breaking Live Headlines Updates : अमित शहा मुंबई दौरा, महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, अभिजित दिपके, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रात्री 10 वाजेनंतर भूकंपाचे धक्के

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रात्री 10 वाजे नंतर भूकंपाचे धक्के जाणवले असून कुठे सौम्य तर कुठे त्याचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असल्याने नागरिक भयभीत होऊन घराच्या बाहेर पडले आहेत, काही दिवसं पासून सुरगाणा तालुक्यात असेच रोज धक्के जाणवले होते.मात्र आता दिंडोरी तालुक्यात प्रथमच रात्रीच्या सुमारास होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक धास्तावले आहे

जर तुम्ही चूक सुधारली नाही तर तुमचा पक्ष खड्ड्यात गेला म्हणून समजा, जरांगेंचा सरकारला इशारा

तुम्हे कोयते हातात घेणार तर मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत येड्यागांडीच्या

बावणकुळेला एवढं टोकाचं भूमिका घेण्याची गरज नाही

जर तुम्ही चूक सुधारली नाही तर तुमचा पक्ष खड्ड्यात गेला म्हणून समजा

मराठ्यांचे भाजप मधील आमदार, मंत्र्यांनी फडणवीसांना सांगावं की बावणकुळेची चूक सुधारा

तुमची गाठ आता मराठ्यांशी आहे लक्षात ठेवा

ज्याची चूक असेल त्याला मी सोडत नाही,छगन भुजबळ बद्दल तुम्हाला माहितीच आहे.

सुनेत्रा पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची केली पाहणी

बारामती तालुक्यातील मेदड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची व रुग्णालयाची पहाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

परतीच्या वारीचा प्रवास पूर्ण; माऊलींची पालखी आळंदीत दाखल

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याचा प्रवास पूर्ण झाला असून, माऊलींची पालखी आज आळंदीत दाखल झाली आहे. वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत आळंदी नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली. वडमुखवाडी येथील धावा सोहळा आणि थोरल्या पादुका मंदिरातील आरतीनंतर माऊलींची पालखी आळंदीकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर पालखी आळंदीत दाखल झाली असून, परतीच्या वारीचा प्रवास पूर्ण झाला आहे. पालखी आळंदीत दाखल होताच वारकरी आणि भाविकांनी भक्तिभावाने माऊलींचे स्वागत केले.

राहुल गांधींचा प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार पुत्रावर आरोप होत असून त्यामुळेच प्रशासनावर दबाव असल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे माजी आमदार केशव आंधळे यांनी केला आहे.माजी आमदार केशव आंधळे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबीयांच्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देत माहिती घेतली.यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा देखील इशारा दिला आहे... दरम्यान रमेश घुले यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

पुण्यात काँग्रेसचा ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मशाल मोर्चा

ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस भवन ते हुतात्मा चौक क्रांती ज्योत यात्रा काढण्यात आलीय.

फरासखाना येथील हुतात्मा चौक येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते या मशाल मोर्चात सहभागी झाले होते.

ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचा आठवण म्हणून आज आम्ही मशाल मोर्चा काढण्यात आला आहे

आज परत एकदा क्रांती करण्याची गरज आहे. क्रांतीज्योत कधीच भिजू नये अशी आमची भूमिका आहे यासाठी काँग्रेस आहे.

विद्यार्थ्यांचा पेपर फुटत आहेत,कायदा करणारे आमदार खासदार फुटत आहेत त्यासाठी परत एकदा क्रांतीची गरज आहे

आज परत एकदा क्रांती करण्याची गरज आहे त्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात आलाय

भारत माता की जय.. वंदे मातरम् घोषणा देण्यात आल्या

अमरावतीमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची महिलेसोबत कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

कथित ऑडिओ क्लिप असलेल्या पदाधिकाऱ्याने महिलेला आक्षेपार्य मेसेज केल्याची चर्चा...

महिलेने फोन केल्यानंतर पदाधिकाऱ्याने मागितली माफी...

व्हायरलं ऑडिओ क्लिप मधील महिलेकडून अमरावती जिल्ह्यातील एका आमदाराच्या नावाचा उल्लेख.

Pune: पुलाचा काही भाग खचल्याने पुढील गावांना जाणारी एसटीबस सेवा बंद

पुण्याच्या भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने, हिरडस मावळ खोऱ्यातील दुर्गम कुडली खुर्द येथील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने पुढील गावांना जाणारी एसटीबस सेवा बंद

एसटी बस सेवा बंद झाल्याने स्थानिक नागरिकांबरोबर परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय

२५ विद्यार्थ्यांना शिरवली येथे शाळेत ये-जा करताना ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे..प्रशासन मात्र सुस्त..

मागील पंधरा दिवसांपासून हिरडस मावळातील धनगरवाडा, कुडली बुद्रुक,कुडली खुर्द तसेच दुर्गाडी या अतिदुर्गम गावांपर्यंत एसटी बस जात नसल्याने दळणवळणाची सोय ठप्प झाली आहे..

दरम्यान या चार गावांमधून जवळजवळ २५ ते ३० विद्यार्थी- विद्यार्थिनी शिरवली माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जात असतात.या विद्यार्थ्यांना दळणवळणाची सोय नसल्याने पायी पायपीट करावी लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे..

सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी तर भोर एसटी आगार व्यवस्थापनाने दुर्गाडी पर्यंत एसटी बस सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांकडून होत आहे...

अतिवृष्टीग्रस्त भागाची अंबादास दानवेंकडून पाहणी; शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

जळगाव जामोद तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून जाण्यासह अनेक ठिकाणी शेती खरडून गेली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इलोरा व येणगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांना फोन करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात एका दिवसात २०३ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, आठ दिवस उलटूनही पंचनामे न झाल्याबद्दल दानवेंनी नाराजी व्यक्त केली.

मुंबईत नव्या मेघालय भवनची उभारणी; विकासासाठी CIDCOकडून एजन्सी नियुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई आणि मेघालयचे वेगळे सांस्कृतिक नाते असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संगीतासाठी मुंबई महत्त्वाचे केंद्र असल्याने मेघालयातील अनेक तरुण येथे येतात. जुने मेघालय भवन अपुरे पडत असल्याने नव्या भवनाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी CIDCOतर्फे एजन्सी नियुक्त करून कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात भविष्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होणार असून, नव्या भवनामुळे मेघालयातील नागरिकांना सुविधा मिळतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रमेश म्हात्रे हद्दपार २० दिवसांनी जेल बाहेर

रमेश म्हात्रे हद्दपार २० दिवसांनी जेल बाहेर

कोल्हापूरच्या भुदरगड किल्ल्याची तटबंदी ढासळली

कोल्हापूरच्या भुदरगड किल्ल्याची तटबंदी ढासळली

किल्ले भुदरगडाची 100 फूट लांबीची तटबंदी ढासळली

गेल्या काही दिवसापासून भुदरगड परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याचा परिणाम

महसूल विभागाकडून घटनेची दखल

वाशिंद-आसनगावदरम्यान ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा पायी स्टेशन गाठण्याचा प्रयत्न

कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन वाशिंद-आसनगावदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे बराच वेळ थांबली. ट्रेन पुढे जात नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उतरत पायी आसनगाव स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. अचानक झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गोसेखुर्द कालवा वर्षभरातच भेगाळला; विजय वडेट्टीवारांनी कंत्राटदार, अभियंत्यांना धरले धारेवर

चंद्रपूर जिल्ह्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम वर्षभरातच भेगाळल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी पाहणी करत कंत्राटदार आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २३५ कोटींच्या कंत्राटातील आतापर्यंत केवळ १५ टक्के काम पूर्ण झाले असून, काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना अखंड पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले.

वैभववाडी कोल्हापूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

पश्चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या वैभववाडी गगनबावडा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. या मार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले मात्र नाधवडे येथील काही भाग अपुरा ठेवण्यात आला आल्याने या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेय. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनचालक आणि प्रवासी वर्गातून होत आहे.

राज्यातील प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींना भेटणार

दिल्लीतील लाठीचार्ज प्रकरणी सरकारने एसआय़टी स्थापन करावी- सुप्रिया सुळे

कोट्यवधींचा गोसेखुर्द उजवा कालवा वर्षातच भेगाळला

ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या वर्षभरातच कालव्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे भर हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

बीड कारागृहात बेकायदेशीर सुविधांची दोन पथकांकडून चौकशी ; तपास पथकांकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त

वाल्मीक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी सवलती दिल्याच्या धनंजय देशमुखांच्या आरोपांनंतर आणि तक्रारीनंतर तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रश्न उपस्थित करत केलेल्या पोस्टनंतर अखेर कारागृहात चौकशी करण्यात आली आहे.पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी बीड कारागृहात काल दिवसभर कसून तपासणी केली आहे.पथकाने कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या नोंदी तपासून काही दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात काल, दि. ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली.

सुनेत्रा पवारांच्या कथित अवमानकारक वक्तव्याचा निषेध; शहापुरात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुख तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथित अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ आज शहापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्रातील भावी अधिकाऱ्यांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून सन्मान

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या ३० भावी अधिकाऱ्यांशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत विशेष संवाद साधला. अंबरनाथच्या शिवसेना नगरसेविका रोहिणी भोईर यांच्या पुढाकारातून ही भेट घडवून आणण्यात आली.यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतील निवासस्थानी आमंत्रित केलं. यावेळी सुशासन, प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि भविष्यातील आव्हानांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.

पोलंडच्या शिष्टमंडळाचा कोल्हापूर दौरा

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील निर्वासितांना कोल्हापूरने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक वारशाला अभिवादन करण्यासाठी पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहे. भारत-पोलंड संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून, वर्षअखेरीस होणाऱ्या पोलंडच्या पंतप्रधानांच्या संभाव्य कोल्हापूर भेटीच्या तयारीच्या दृष्टीनेही या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर संतापल्या

  • महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील खड्डे भरायला पेवर ब्लॉकचा वापर करण्याच्या मुद्द्यावरुन आदिती तटकरे यांनी व्यक्त केला संताप

  • 10 वर्षांपासून आम्ही हेच ऐकत आहोत, हे राहत देखील नाहीत, एक ST गाडी गेली की निघतात असा अनुभव सांगत आदिती तटकरे यांनी पेव्हर ब्लॉकच्या वापरा बाबत व्यक्त केला संताप

नाशिक - मराठीच्या मुद्द्यावरून महासभेत पुन्हा गोंधळ

- MNGL च्या अधिकाऱ्यांनी हिंदीत उत्तर देण्यास सुरुवात केल्यानं ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक

- MNGL च्या अधिकाऱ्यांनी मराठीतून उत्तर देण्याची मागणी

- अखेर शिंदे सेनेचे नगरसेवक आणि महापौरांनी मध्यस्थी करत गोंधळ मिटवला

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहन चालक आक्रमक

  • सहा महिन्यापासून वेतन रखडल्याने 102 रुग्णवाहिका चालक संपावर

  • नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 51 रुग्णवाहिका चालकांचे काम बंद आंदोलन

  • मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा

  • रुग्णवाहिका बंद असल्याने दुर्गम भागातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

नाशिक- खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना महापौरांकडून मदतीचा धनादेश

प्रत्येकी 5 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. एकूण 6 कुटुंबियांना धनादेश दिला आहे.

भाजपचे खासदार धनंजय महाडिक सहपरिवार आमदार सतेज पाटील यांच्या भेटीला

पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या निधनानंतर आज खासदार धनंजय महाडिक त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची भेट

गेली अनेक वर्षांचा राजकीय वैर विसरून खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली सतेज पाटील यांची सांत्वन पर भेट

अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वावर आरोप करीत दोघांचे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यासमोर उपोषण सुरू

अभिजीत दिपके यांनी मुख्य प्रवक्ते आणि काही सदस्यांसोबत दोन दिवस बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीच्या आणि CJP च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अहमदाबाद मधील कॉकरोच जनता पार्टीच्याच दोन तरुणांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.

नाशिकमध्ये विशेष महासभेला होणार सुरुवात

- शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरावस्था, काही नागरिकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ विरोधकांचं आंदोलन

- ॲम्ब्युलन्समधून प्रतिकात्मक स्वरूपात जखमी अवस्थेत महासभेला येऊन प्रशासनाचा निषेध करणार आहेत

नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

काल सकाळी 11 वाजता आला मेल

15 ऑगस्ट ला शाळेला उडवून देण्याची धमकी

मेल फेक असल्याची माहिती मात्र,मेल कुठून आला कुणी पाठवला याचा तपास एमआरआय पोलिस करत आहेत

मात्र 15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर नवी पोलिस अलर्ट मोडवर

एफडीएच्या कारवाईनंतर ग्राहकांमध्ये झालेली बदनामी टाळण्यासाठी अमरावतीतील प्रसिद्ध हॉटेल रोशनी ची बॅनरबाजी

हॉटेल रोशनी एक नवीन रूप लवकरच येत आहे; आम्ही आमच्या जागेला नवीन रुप(मेकओव्हर) देण्यासाठी एक छोटा ब्रेक घेत आहे..

गैरसोयीबद्दल क्षमस्व आम्ही लवकरच परत येऊ अशा आशयाच लावला हॉटेल रोशनीने पोस्टर...

ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनतात त्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने हॉटेल रोशनीचा परवाना काही दिवसांसाठी अन्न व औषध प्रशासनाने केला आहे रद्द...

नीट पेपर २०२६ कसा फुटला? सीबीआय ने तपासात केला पर्दाफाश

नीट पेपरफुटीची A to Z टाइमलाईन अखेर आली समोर

तांत्रिक पुरावे, हस्तलिखित नोट्स, मोबाईल यंत्रणा आणि आर्थिक व्यवहार, सी बी आय ने उघडकीस आणली पेपरफुटीची "सप्लाय चेन"

सी बी आय ने न्यायालयात सादर केलेल्या हजारो पानांच्या दोषारोपपत्रातून सगळं आलं समो

शरद पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार

सोमवारी दिल्लीत सर्व खासदार एकत्रित मोदी यांची भेट घेणार

भेटीचे कारण समजू शकलं नाही

दापोलीत मध्यरात्री धक्कादायक प्रकार; गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ

दापोली तालुक्यातील आंजर्ले आडेफाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. गुरांना बेशुद्ध करण्यासाठी काही पदार्थ खायला घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंजर्ले येथील युवकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.गुरे पकडल्यानंतर दोन वाहने दापोलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेली.

अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरु

नाशिक महापालिकेची आज विशेष महासभा

- शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्ण कामं आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा

- काल याच मुद्द्यावर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

- कुंभमेळ्याच्या कामांची सुस्त गती आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी ठेकेदारांना दिला अल्टिमेटम

- तर आजची होणारी महासभा देखील वादळी होण्याची शक्यता

- मागील काही दिवसांपासून खड्ड्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष

कर्जमाफीच्या यादीत नाव आले, मात्र 'ई-केवायसी'चे घोडे अडले !

कर्जमाफीच्या यादीत नाव आले, मात्र 'ई-केवायसी'चे घोडे अडले !

१७ हजारांवर शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी असल्याने फार्मर आयडी उपलब्ध नाही

अहिल्यानगरमध्ये अज्ञात इसमान कडून 42 वर्षीय महिलेची हत्या

अज्ञात इसमान कडून 42 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या..

पारनेर तालुक्यातील कडूस गावाजवळील डोंगर परिसरातील घटना..

अज्ञात चार ते पाच आरोपी विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कबनूरमध्ये रिलसाठी गोळीबारात तरुण जखमी

इचलकरंजी- कोल्हापूर मार्गावरील हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

बांद्यात बेकायदा दारुसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्या मुंबई गोवा महामार्गावर बांदा आरोसबाग येथे गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.

इनोव्हा गाडीतून होणाऱ्या या गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पाथकाने कारवाई केली.

यात १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अभिजीत दिपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी

- अभिजीत दिपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी

- महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

- पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप; अभिजीत दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी

- पोलीस संरक्षण काढले नाही तर आंदोलन करण्याचा महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचा इशारा

Latur : पावसाळ्यातही हळदुर्ग-बऱ्हाणपूर गावांना भीषण पाणीटंचाई; लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना कुचकामी

अर्धा पावसाळा सुरू होऊनही हळदुर्ग आणि बऱ्हाणपूर गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली जलजीवन योजनेअंतर्गत ची पाणीपुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शासनाकडून पाणीपुरवठा योजनेसाठी मोठा निधी खर्च करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात या योजनेचा नागरिकांना अपेक्षित फायदा मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.महिला आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

एमआयडीसीच्या भूखंडावर प्रशासनाची कारवाई, ३० भूखंडधारकांना नोटिसा

वाशिम जिल्ह्यातील एमआयडीसीच्या भूखंडांबाबत आता प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. भूखंड वाटप होऊनही अनेक ठिकाणी अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत.

त्यामुळे रिक्त आणि विनावापर भूखंडांचा आढावा घेऊन ते परत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाशिम आणि मालेगाव येथील प्रत्येकी १५, अशा एकूण ३० भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नियमानुसार उद्योग उभारणी न झाल्यास संबंधित भूखंड महामंडळाच्या ताब्यात घेतले जाणार आहेत.

कुंभार्ली घाटाची अक्षरशः चाळण; खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कुंभार्ली घाटातील रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. अवघड वळणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या घाटातील अनेक वळणांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या खड्डेमय घाटातून प्रवास करावा लागतोय.

पुण्यात डेंग्यूचे ६७१ संशयित रुग्ण,  जुलै अखेर २७ जणांना लागण

पुण्यात डेंग्यूचे ६७१ संशयित रुग्ण

जुलै अखेर २७ जणांना लागण

चिकनगुनियाचेही ७ रुग्ण पॉझिटिव्ह

पुण्यात आयोजित अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधी महामोर्चा

पुण्यात आयोजित अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधी महामोर्चा

आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन

अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या संभाव्य उपवर्गीकरणाच्या (अ, ब, क, ड) विरोधात पुण्यात मंगळवारपेठ जुनाबाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार मोर्चा

अनुसूचित जातींचे प्रलंबित प्रश्न, उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवणे आणि जातनिहाय जनगणना करण्याची प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार

Pune: नीट पेपरफुटी प्रकरण,  एन टी ए च्या तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका फुटल्या, सी बी आय चा निष्कर्ष?

पेपरफुटी हा अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सुनियोजित गुन्हेगारी कटाचा भाग

या कटात राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मधील काही विषयतज्ज्ञांनी गोपनीय प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप

प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी एक "सप्लाय चेन" कार्यरत असल्याचे तपासातून समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com