दिवसभरात कमी पाणी पिताय? शरीरावर होतो 'हा' भयानक परिणाम, ८ वा धोका तर जीवघेणा

Manasvi Choudhary

पाणी

पाणी हे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र व्यस्त जीवनशैलीमुळे आपण कमी पाणी पितो. पण तुम्हाला माहितीये का? कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात नेमके कोणते बदल होतात.

water | yandex

शरीराच्या अंतर्गत होतात अनेक बदल

शरीराचा जवळपास ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. अशा वेळी जर तुम्ही शरीराला आवश्यक तेवढे पाणी न प्यायल्यास शरीराच्या अंतर्गत अनेक बदल होतात जे घातक ठरू शकतात.

Less Water Side Effects | Social Media

थकवा आणि अशक्तपणा

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ऊर्जा कमी होते. सतत थकवा जाणवतो आणि कामात लक्ष लागत नाही.

dizziness | pinterest

डोकेदुखी आणि चक्कर येणे

डिहायड्रेशनमुळे मेंदूवर परिणाम होऊन डोकेदुखी, चक्कर आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.

Less Water Side Effects | canva

बद्धकोष्ठता

पुरेसे पाणी न मिळाल्यास मल कठीण होतो आणि शौचास त्रास होतो.

Less Water Side Effects | yandex

मूत्रपिंडातील खडे

कमी पाणी प्यायल्यामुळे मूत्र घट्ट होते, त्यामुळे खडे होण्याचा धोका वाढतो.

kidney stone

मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो

पुरेसे पाणी न प्यायल्यास जीवाणू मूत्रमार्गातून सहज बाहेर पडत नाहीत, त्यामुळे संसर्गाची शक्यता वाढते.

Urinary Tract Infection (UTI)

त्वचा कोरडी आणि निस्तेज होते

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी पडते, लवचिकता कमी होते आणि निस्तेज दिसू लागते.

dry skin | pintrest

रक्तदाब कमी होणे आणि हृदयावर ताण

शरीरातील द्रव कमी झाल्याने रक्ताचे प्रमाण घटू शकते, त्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते.

Low Blood Pressure

उष्माघात

व्यायामादरम्यान कमी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो.

Heat | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Book Reading Benefits | Saam TV

NEXT: रोज सकाळी मिठाचे पाणी प्या, बद्धकोष्ठता ते अपचनाच्या समस्या होतील कायमच्या दूर

Salt Water Benefits | Benefits
येथे क्लिक करा...