India vs england test series top 5 performers in this series yashasvi jaiswal shubman gill jasprit bumrah rohit sharma r ashwin  twitter
Sports

IND vs ENG Test Series: टीम इंडियाचे ५ शिलेदार,कामगिरी दमदार! इंग्लंडला लोळवून दाखवलं

Top 5 Performers In IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ४-१ ने मालिका जिंकली आहे

Ankush Dhavre

India vs England Test Series:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ४-१ ने मालिका जिंकली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आणि भारतीय संघाला इंग्लंविरुद्ध मालिका विजय साकारता आला. दरम्यान जाणून घ्या या मालिका विजयातील भारताचे ५ शिलेदार.

यशस्वी जयस्वाल:

यशस्वी जयस्वाल हा भारताच्या विजयाचा मुख्य शिलेदार आहे. जयस्वालने पहिल्याच सामन्यात ८७ धावांची खेळी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत दुहेरी शतकी खेळी केली. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या खेळीच्या बळावर त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या मालिकेतील ९ डावात ८९.०० च्या सरासरीने ७१२ धावा चोपल्या.

शुभमन गिल:

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेल्या गिलला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो स्वस्तात माघारी परतला होता. मात्र त्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली आणि दणक्यात कमबॅक केलं. त्यानंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याने शतक झळकावलं आहे. त्याच्या या मालिकेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९ डावात ५६.५० च्या सरासरीने ४५२ धावा केल्या आहेत. (Cricket news in marathi)

आर अश्विन:

मालिकेतील पाचवा कसोटी सामना हा आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना होता. या सामन्यातही त्याने ९ गडी बाद केले. संपूर्ण मालिकेत आर अश्विन हा इंग्लंडच्या फलंदाजांना नडला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात त्याने ५ गडी बाद केले. दरम्यान या संपूर्ण मालिकेतील ५ सामन्यांमध्ये त्याने २६ गडी बाद केले. तो या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.

जसप्रीत बुमराह:

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत बुमराहने एकट्याच्या खांद्यावर भार घेत संघासाठी शानदार गोलंदाजी केली. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा बुमराहने येऊन संघाला ब्रेक थ्रु मिळवून दिला. बुमराहने या मालिकेतील ८ डावाक १९ गडी बाद केले.

रोहित शर्मा:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मालिकेतील शेवटच्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली. रोहितने फलंदाजीत तर शानदार कामगिरी केलीच मात्र कर्णधार म्हणूनही तो सुपरहिट ठरला. कारण जेव्हा जेव्हा संघ बॅकफूटवर असायचा तेव्हा रोहित योग्य गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी बोलवायचा. योग्य क्षेत्ररक्षकाला योग्य जागी उभं करणं ही जबाबदारी रोहितने योग्यरित्या पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT