team india Saam TV
क्रीडा

World Cup Points Table: दुगना लगान वसूल! इंग्लंडला लोळवून टीम इंडिया पहिल्या स्थानी; कोण टॉप ४ मध्ये, कोण बाहेर जाणार? पाहा पॉइंट टेबल

Ankush Dhavre

World Cup 2023 Points Table:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी २३० धावांचा बचाव करताना १०० धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारतीय संघाने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.

भारतीय संघ अव्वल, इंग्लंड बाहेर..

हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान होता. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानी होता. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करताच भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. हे ६ सामने जिंकून १२ गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर ६ पैकी केवळ १ सामना जिंकणारा इंग्लंडचा संघ २ गुणांसह सर्वात शेवटी आहे. या पराभावसह इंग्लंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पाडला आहे.

या पराभवासह इंग्लंडचे वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये जाण्याचे दार बंद झाले आहेत. इंग्लंडने पुढील ३ सामने जरी जिंकले तरी ८ गुण होतील. त्यामुळे इंग्लंडचा संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

टॉप -४ मध्ये कोण?

टॉप ४ मध्ये भारतीय संघ १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेने १० गुणांची कमाई केली आहे. तर ८ गुणांसह न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी आणि ८ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानी आहे.

श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँडचे प्रत्येकी ४-४ गुण आहेत. हे संघ अनुक्रमे पाचव्या, सहाव्या,सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. तर २ गुणांसह बांगलादेशचा संघ नवव्या आणि इंग्लंडचा संघ दहाव्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT