arshdeep singh Saam TV
Sports

IND vs ENG : पहिल्याच टी-20 सामन्यात अर्शदीपची उत्कृष्ट कामगिरी; तरीही उर्वरीत सामन्यात मिळणार नाही संधी!

अर्शदीपने आपल्या पहिल्याच टी-20 सामन्यात 3.3 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : तीन टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 8 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 148 धावांत गारद झाला. भारताच्या विजयात हार्दिक पांड्याची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर गोलंदाजीत चमत्कार करताना 4 विकेट्स घेतल्या. (Ind vs Eng T-20 Latest News)

हार्दिक व्यतिरिक्त अर्शदीप सिंगनेही टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने पहिले षटक मेडन टाकले. अर्शदीपने सामन्यात 3.3 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने रीस टोपली आणि मॅट पार्किन्सन यांच्या विकेट घेतल्या.

अर्शदीपकडे डेथ ओव्हर्समध्ये स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून पाहिले जाते. पण, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये त्याने नव्या चेंडूवर चांगली गोलंदाजी केली. आयपीएल 2022 मधील दमदार कामगिरीनंतर अर्शदीपची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली. मात्र, त्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20I मालिकेतही तो बेंचवर राहिला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून खेळण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले. पण, पदार्पणाच्या T20 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही तो पुढील 2 T20 खेळू शकणार नाही, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 साठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश नाही. एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-20 सामन्यात संघात पुनरागमन करणार आहे.

IPL मध्ये अर्शदीपची चांगली कामगिरी

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप डेथ ओव्हरमध्ये सतत यॉर्कर टाकू शकतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने या अस्त्राने दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्याने 37 आयपीएल सामन्यात 40 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी 8.35 इतकी होती.

अर्शदीप 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. शिवम वामी, इशान पोरेल आणि कमलेश नागरकोटी यांच्याशिवाय तो त्या संघातील चौथा वेगवान गोलंदाज होता. मात्र, अर्शदीपला त्या स्पर्धेत बरेच सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, अर्शदीपने या तिन्ही गोलंदाजांसह भारतासाठी पदार्पण केले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT