IND vs ENG saam tv
Sports

IND vs ENG Semi Final: इंग्लंडने जिंकला टॉस; टीम इंडियाविरूद्ध पहिल्यांदा करणार गोलंदाजी, पाहा भारताची प्लेईंग ११

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकप सेमीफायनल सामना रंगला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दोन्ही टीम आमने सामने आल्या आहेत. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना जो जिंकेल ती टीम फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.

गतविजेती टीम इंडिया यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी दावेदार मानली जातेय. त्यामुळे वानखेडेच्या मैदानावर आजचा सामना जिंकून टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर न्यूझीलंडने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. ८ मार्च रोजी अहमदाबादच्या मैदानात न्यूझीलंड वर्ल्डकप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर आजचा सामना झाल्यानंतर न्यूझीलंडविरूद्ध फायनलमध्ये कोणती टीम उतरणार हे स्पष्ट होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेती टीम रविवारी न्यूझीलंडविरोधात खेळणार आहे. त्याआधी आज मुंबईच्या वानखेडेवर मैदानात इंग्लंड आणि भारत यांच्या लढत होणार आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ कशी असेल हे पाहूयात.

कशी असेल टीम इंडिया प्लेईंग ११?

इशान किशन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव , हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग

सामन्यात पाऊस पडला तर?

जर आजच्या सामन्यात पाऊस पडला तर कोणती टीम फायनलमध्ये जाणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र आयसीसीने नॉकआऊटच्या सामन्यांसाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडला तर उद्या म्हणजेच ६ मार्च रोजी सामना खेळवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT