team india saam tv
Sports

IND vs ENG Records: भारताने कॅनडाला मागे सोडत जपानची केली बरोबरी! हा रेकॉर्ड तुम्हाला माहितच नसेल

Team India Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. यासह भारतीय संघाने जपानची बरोबरी केली आहे.

Ankush Dhavre

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मोठ्या विजयाची नोंद केली आहे. हा सामना भारताने १५० धावांनी आपल्या नावावर केला. यासह टी-२० मालिका ४-१ ने आपल्या नावावर केली.

हा विजय भारतीय संघासाठी अतिशय खास ठरला आहे. इंग्लंडला धूळ चारताच भारताने कॅनडाला मागे सोडलं आहे. तर जपानची बरोबरी केली आहे. असा कोणता रेकॉर्ड आहे, ज्यात भारताने जपानची बरोबरी केली आहे? जाणून घ्या.

जगभरात १४० असे देश आहेत ज्यांना आयसीसीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची मान्यता दिली आहे. आता भारताने या सर्व देशांना मागे सोडत मोठ्या रेकॉर्डमध्ये जपानची बरोबरी केली आहे. भारताचा संघ सर्वाधिक वेळेस १०० पेक्षा अधिक सामने जिंकण्याच्या रेकॉर्डमध्ये संयुक्तरित्या अव्वल स्थानी येऊन पोहोचला आहे.

यापूर्वी जपानने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळेस विरोधी संघाला १०० किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत केलंय. आता भारताने देखील टी-२० क्रिकेट खेळताना विरोधी संघाला ८ वेळेस १०० किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत केलंय. यापूर्वी भारतीय संघ कॅनडा संघासोबत संयुक्तरित्या सातव्या स्थानी होता. कॅनडाने टी-२० क्रिकेटमध्ये विरोधी संघाला ७ वेळेस १०० हून अधिक धावांनी पराभूत केलंय.

आश्चर्यकारक बाब अशी की, भारतीय संघानंतर झिम्बाब्वेचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेने ६ वेळेस १०० हून अधिक धावांनी विजय संपादन केला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना केवळ ४ वेळेस १०० हून अधिक धावांनी विजय मिळवता आला आहे. आता भारतीय संघ जपानला मागे सोडणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाचा शानदार विजय

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT