team india twitter
Sports

IND vs ENG, 5th T20I: बटलरने सलग दुसऱ्यांदा जिंकला टॉस; सूर्याने मॅचविनर खेळाडूला बसवलं; पाहा प्लेइंग ११

India vs England Playing XI Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने ही मालिका आधीच जिंकली आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ टी-२० मालिका ४-१ ने खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

कोण इन, कोण आऊट?

या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग ११ मध्ये १ मोठा बदल केला आहे. भारतीय संघ गेल्या सामन्यात ज्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरला होता. त्याच प्लेइंग ११ सह खेळताना दिसून येणार आहे. मात्र अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मधून विश्रांती दिली गेली आहे. तर अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे.

हा सामना शमीसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण कमबॅक केल्यानंतर शमीला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात शमीला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भारतीय संघ आघाडीवर

भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिका ३-१ ने खिशात घातली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (Playing XI):

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड (Playing XI):

फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बॅथेल, ब्रायडन कर्स, जेमी ओव्हर्टन, जोफ्रा आर्चर, अदिल रशीद, मार्क वुड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT