भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र चौथ्या दिवसाचा लंच झाल्यानंतर इंग्लंडने भारतीय संघाला लागोपाठ २ मोठे धक्के दिले आहेत.
भारतीय संघाला लागोपाठ २ धक्के...
भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत बिनबाद ४० धावा केल्या होत्या. रोहित २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावांवर माघारी परतला. दोघांनी चौथ्या दिवसाची चांगली सुरुवात केली. मात्र रोहित यशस्वी जयस्वाल स्वरुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. यशस्वी जयस्वाल ३७ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा अर्धशतकी खेळी करत माघारी परतला. चौथ्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी आलेला रजत पाटीदार या सामन्यातही स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही. तो खातं ही न उघडता शून्यावर माघारी परतला. (Cricket news marathi)
लंचपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. मात्र शोएब बशीरच्या एका षटकात सामना भारतीय संघाच्या हातून निसटताना दिसून आला. शोएब बशीर ३९ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर रविंद्र जडेजा फुल टॉस चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला.
रविंद्र जडेजाला या डावात ४ धावा करता आल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सरफराज खान झेलबाद झाला. त्याला खातं ही उघडता आलं नाही. सरफराज खान कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.